मुंबई

भाजप म्हणतंय वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील कोविड सेंटरमध्ये मोठा भ्रष्टाचार, राज्यपालांच्या दारी जाणार आणखी एक वाद

सुमित बागुल

मुंबई - मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये MMRDA मार्फत बनवण्यात आलेलं कोविड सेंटर आता पुन्हा विवादात सापडताना पाहायला मिळतंय. याला कारण म्हणजे मुंबई महापालिकेतील भाजप पक्ष नेते विनोद मिश्रा यांचे आरोप. विनोद मिश्रा यांनी MMRDA ने उभारलेल्या कोरोना हॉस्पिटल उभारणीवरच अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. त्यांनी MMRDA च्या कामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केलाय. विनोद मिश्रा यांनी म्हटलंय की MMRDA ने या हॉस्पिटलचं 59.27 करोड रुपयांचं बिल मुंबई महानगरपालिकेला पाठवलंय, जे नियमांचं उल्लंघन करणारं आहे. 
    
भाजप नेते विनोद मिश्रा यांनी म्हटलंय की MMRDA ने बाजार भावापेक्षा दोन ते तीन पट अधिक रकमेने बिलं पाठवली आहेत. याबाबत विनोद मिश्रा यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना एक पत्र लिहिलंय. त्यात त्यांनी MMRDA चा BMC च्या धोरणात्मक निर्णयात कसा समावेश होऊ शकतो याबाबत सवाल उपस्थित केलाय.  

विनोद मिश्रा यांनी आपल्या या पत्राची एक प्रत मुंबई महापालिकेतील विरोधीपक्ष नेते रवी राजा, भाजपचे गट नेते प्रभाकर शिंदे, राष्ट्रवादीच्या गट नेत्या राखी जाधव, समाजवादी पक्षाचे गट नेते रईस शेख यांना देखील दिली आहे. विनोद मिश्रा यांनी म्हटलंय की याबाबतीत ते विधानसभा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे तक्रार करणार आहेत. 
      
भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी ममहापौर किशोरी पेडणेकर यांना जुलैमध्ये महापालिकेची सभा घ्यावी असं निवेदन दिलंय. कोरोनामुळे एप्रिल, मे आणि जून महिन्यात महापालिकेची सभा झालेली नाही. आता जुलैच्या 29, 30 आणि 31 तारखेला महापालिकेची बैठक बोलावण्यात अली आहे. मात्र ही बैठक रद्द होऊ शकते अशीही भीती त्यांनी व्यक्त केलीये. त्यामुळे ही बैठक कोणत्याही परिस्थितीत व्हावी असं विनोद मिश्रा यांचं म्हणणं आहे. 

huge corruption in construction of bandra kurla complex covid center says bjp

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT