Nawab Malik-Devendra Fadnavis
Nawab Malik-Devendra Fadnavis google
मुंबई

'हॉटेलचं फुटेज दिलं, तर तोंड दाखवायला...', मलिकांचा फडणवीसांवर गंभीर आरोप

सकाळ वृत्तसेवा

- सुशांत सावंत

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (Ncp) आणि प्रवक्ते नवाब मलिक (Nawab malik) यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "समीर खान (Sameer khan) केसमध्ये आरोपपत्र (Chargesheet) आधीच दाखल झालं आहे. तुम्ही जे आरोप करत आहात त्याविषयी माफी मागणार का?" असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला. "जनतेच्या हितासाठी मी 100 वेळा राजीनामा दयायला तयार आहे. माझ्यावर आरोप केला गेला की, नवाब मलिक यांनी कोर्टाच्या आदेशाची अवहेलना केली. लोकायुक्तांसमोर आम्ही सर्व गोष्टी ठेवलेल्या आहेत. मी त्यावेळी राजीनामा दिला पण 2008मध्ये पुन्हा मंत्री झालो" असे नवाब मलिक म्हणाले.

"त्यावेळी सुप्रीम कोर्टाने देखील सांगितले होते की,नवाब मलिक यांनी जे आदेश दिले आहेत ते योग्य आहेत. आजवर कुणाची हिंमत नाही झाली की, माझे अंडरवर्ल्ड सोबत संबंध आहेत असे म्हणण्याची" असे नवाब मलिक म्हणाले.

"मागील पाच वर्षे तुम्ही मुख्यमंत्री होता. गृहखाते तुमच्याकडे होते. तुमचा भाऊ हॉटेलमध्ये काय करतो हे मी सांगितले होते. त्यावेळी जर मी त्या हॉटेल्सचे फुटेज दिले असते, तर तोंड दाखवायला जागा राहिली नसती" असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.

तुमच्या काळात फॉर सिजन हॉटेलमध्ये सतत पार्टीचे आयोजन होत होते. रात्रभर पार्टी सुरू असायची. १५ कोटीच्या पार्टीचा आयोजक कोण होता?तुमच्या काळात त्या पाटर्या होत होत्या, सरकार बदलताच त्या पार्ट्या बंद झाल्या असे नवाब मलिक म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: EDचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र; केजरीवालांना जामीन का देऊ नये? दिली यादी

Yuvraj Singh T20 WC 2024 : रोहितपेक्षा 'या' दिग्गजाच्या गळ्यात असावं वर्ल्डकपचं मेडल... युवराज सिंगनं कोणाचं नाव घेतलं?

CEO K Krithivasan Salary: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी संभाळणारे के कृतिवासन यांचा पगार किती?

PBKS vs RCB Live Score : आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघ लावणार जोर

Dabholkar Murder Case Timeline: नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाचा 10 वर्षांनंतर लागणार निकाल? आतापर्यंत काय घडामोडी घडल्या?

SCROLL FOR NEXT