मुंबई

आता ATM शिवाय काढा २० हजारांपर्यंत रक्कम कॅश..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - ICICI बँकेने आपल्या ग्राहकांना नवीन वर्षात एक अनोखं गिफ्ट दिलं आहे. आता ICICI बँकेच्या ATM मधून ATM कार्डशिवाय तब्बल २० हजार रुपये काढता  येणार आहे. ICICI बँकेने ATM मधून 'कार्डलेस कॅश विड्रॉल'च्या सेवेची घोषणा केलीये. यामध्ये ग्राहक बँकेच्या iMobile या ऍपमधून २० हजार रुपयांपर्यन्त कॅश ATM मधून काढू शकतात. डेबिट कार्डचा उपयोग न करताही पैसे काढण्याची ही एक सोपी पद्धत आहे. दररोज ग्राहक या सेवेच्या माध्यमातून २० हजारांपर्यंत कॅश काढू शकणार आहेत.

ICICI बँक सुरुवातीपासूनच डिजिटल व्यवहारांमध्ये अग्रेसर आहे. याचाच एक भाग म्हणून Cardless Cash Withdrawal चा फायदा ग्राहकांना होऊ शकतो, असं ICICI बँकेचे कार्यकारी संचालक अनुप बागची यांनी म्हंटलय. हे व्यवहार अतिशय  सुरक्षित आहेत. डेबिट कार्डचा वापर न करता पैसे काढणं हे ICICI च्या ग्राहकांसाठी नवा अनुभव असणार आहे. त्यामुळे ICICI बँकेचे सगळे चॅनल्स आणि टच पॉइंट्समध्ये नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर लक्ष द्यावं लागेल आणि ग्राहकांना बँकेच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत असंही त्यांनी सांगितलं आहे.

असं करा Cardless Cash Withdrawal -

  • ICICI च्या "i mobile" अ‍ॅपमध्ये लॉग इन करा
  • सर्व्हिस अँड कॅश विड्रॉवल अ‍ॅट ICICI बँक ATM चा पर्याय निवडा
  • किती पैसे काढायचे आहेत ती रक्कम टाका
  • अकाउंट नंबर निवडा
  • 4 आकडी तात्पुरता पिन बनवा आणि सबमिट करा
  • लगेचच एक रेफरन्स OTP येईल    
  • ICICI बँकेच्या कोणत्याही ATM मध्ये जा 
  • कार्डलेस कॅश विड्रॉल हा पर्याय निवडा
  • आलेला OTP आणि डिटेल्स तिथे भरा
  • यानंतर तुम्हाला पैसे मिळतील.  

ICICI bank to offer cardless cash withdrawl upto 20 thousand

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT