rain and corona 
मुंबई

पावसाळ्यात कोरोनाचा फैलाव वाढणार? आयआयटी मुंबईचा नवा अंदाज; वाचा नेमकं काय आहे तर...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोना विषाणूने राज्यासह मुंबईत धुमाकूळ घातला असून पावसाळ्यात ही परिस्थिती आणखी गंभीर होणार असल्याची भीती आयआयटी मुंबईच्या संशोधनातून व्यक्त करण्यात आली आहे. उन्हाळ्यात वातावरणात उष्णता असल्यामुळे कोरोनाग्रस्त व्यक्ती शिंकल्याने किंवा खोकल्याने जे थेंब बाहेर पडतात ते उष्णतेमुळे लवकर सुकून जातात. मात्र पावसाळ्यात उष्णता केवळ 10 टक्के असल्यामुळे कोरोना विषाणूचे थेंब अनेक नागरिकांपर्यंत पोहोचणार असल्याचे आयआयटीच्या प्राध्यापकांनी केलेल्या अभ्यासात उघडकीस आले आहे. त्यामुळे आता पावसाळ्यात कोरोनाचा प्रभाव झपाट्याने वाढण्याची शक्यता अभ्यासातून वर्तवण्यात आली आहे.

आयआयटी मुंबई मधील प्राध्यापक रजनीश भारद्वाज आणि अमित अग्रवाल यांनी देशातील सहा शहरातील कोरोनाग्रस्त व्यक्तींच्या अभ्यास केला आहे. कोरोनाग्रस्त व्यक्ती शिंकल्यानंतर किंवा खोकल्यानंतर विषाणू थुंकी वाटे बाहेर पडतात. त्यामुळे थुंकीचे थेंब किती वेळ जिवंत राहू शकतात आणि थुंकी सुकण्यासाठी किती वेळ तसेच उष्णता लागते याचा अभ्यास केला. उष्णता कमी असणाऱ्या शहरातील कोरोना रोगाच्या आकडेवारीचा अभ्यास केला असून उष्णता कमी असणाऱ्या शहरात कोरोना पाच पट्टीने जास्त झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास आले.

व्यक्तीला कोरोना झाल्यास त्या व्यक्तीला खोकला आणि शिंका येतात. व्यक्ती शिंकल्यानंतर शेकडो विषाणूचे थेंब बाहेर पडतात. हे थेंब सुकून नष्ट होण्यासाठी मोठ्याप्रमाणात उष्णता लागते. मात्र आता पावसाळा येणार असल्याने मुंबईतील परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. 

वातावरणातील बदलाचा फटका
आता जून महिना चालू झाला असून वातावरणात झपाट्याने बदल होत आहे. काही दिवसाने मुंबईमध्ये ऊन पूर्णपणे कमी होणार असल्यामुळे उष्णता 80 ते 90 टक्के कमी होणार आहे. त्यामुळे कोरोना विषाणू नष्ट होणार नसून विविध ठिकाणी तो तसाच जिवंत राहणार असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT