best 
मुंबई

खबरदारी म्हणून बेस्टने घेतला वाहकांबाबत महत्वाचा निर्णय

सकाळवृत्तसेवा

मुंबई ः कोरोनाचे आक्रमण सुरु झाल्यापासून जीवनावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी बेस्टच्या बसगाड्या अहोरात्र धावत आहे. दरम्याच्या काळात बेस्ट उपक्रमातील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने बेस्ट प्रशासनाने खबरदारी म्हणून काही महत्वाचे निर्णय घेतले आहे. 

सध्या बेस्टकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी असणारी सेवा बंद आहे. केवळ पोलिस, महापालिका, बेस्ट कर्मचारी, आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बेस्टकडून निःशुल्क सेवा दिली जात आहे. केवळ अन्य सेवेतील कर्मचाऱ्यांना निर्धारित तिकिट काढावी लागते. त्यामुळे बेस्टने काही महत्वाचे निर्णय घेतले आहे. सरकारी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या फेऱ्यांमधील बसमध्ये वाहकांची सेवा बंद करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मात्र बेस्ट प्रशासनाने वाहक कोणत्या बसमध्ये नसतात हे सांगणे टाळले असून सध्या वीस टक्के बेस्ट बस वाहकांविना धावत आहे. या प्रकारे वाहकांविना धावणाऱ्या बेस्ट बसचे प्रमाण वाढवण्याचा बेस्ट प्रशासनाचा विचार आहे. 

प्रवासी नसलेल्या मार्गावर वाहकांची गरज नाही, हा विचार बेस्ट प्रशासन करीत आहे.अन्य सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बेस्टची सेवा सुरु आहे. त्या बेस्ट बसमध्ये कंडक्टर अर्थात वाहक आवश्यक आहेत. वाहक असलेल्या बेस्ट बसमध्ये चालकाच्या पाठीमागे प्लॅस्टिकचा पडदा लावण्याबाबत बेस्ट विचार करत आहे. यावेळी वाहकही चालकाच्या शेजारील भागात असेल. त्यामुळे बेस्टचे दोन्ही कर्मचारी प्रवाशांच्या फारसे संपर्कात येणार नाही. बेस्टचे कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे हा प्रस्ताव समोर आला आहे. मात्र या प्रस्तावास अद्याप बेस्ट प्रशासनाने मंजूरी दिलेली नाही, असेही सांगण्यात आले. आत्तापर्यंत बेस्टमधील 236 कर्मचाऱ्यांचे विलगीकरण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण सुरूच! मात्र LPG गॅस टंचाईमुळे हे शेअर्स आजही तेजीत

Summer Skincare Home Remedies: चेहऱ्यावरची चमक हरवलीय? उन्हाळ्यात त्वचा उजळवण्यासाठी करा ‘हे’ 7 सोपे घरगुती उपाय

Rahul Dravid: ‘द वॉल' राहुल द्रविड यांना जीवनगौरव पुरस्कार; बीसीसीआयच्या वार्षिक सोहळ्यात विश्वविजेत्या संघांचाही गौरव होणार

Shivaji University : ठरलं! शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचा क्लायमॅक्स जवळ; पाहा मुलाखतीसाठी कुणा-कुणाची नावे शॉर्टलिस्ट? 115 अर्ज, पण संधी फक्त 25 जणांना

LPG Price Hike:सिलिंडरच्या दरवाढीमुळे सामान्यांना फटका! घरगुती सिलिंडर ६० तर व्यावसायिक सिलिंडर ११४ रुपयांनी महाग; आर्थिक गणित बिघडलं..

SCROLL FOR NEXT