मुंबई

उपमुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स आज संपणार ?

सकाळ वृत्तसेवा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहा मंत्र्यांनी शपथ घेऊन आता आठवडाभरापेक्षा जास्त दिवस उलटलेत. मात्र अजूनही मंत्रीमंडळ विस्ताराबाबत कोणतीच ठोस अशी बातमी समोर येताना दिसत नाहीये. अशातच आज मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस म्हणजेच महाविकास आघाडीची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. तब्बल एक तासापेक्षा जास्त काळ ही बैठक सुरु होती.  

या बैठकीत प्रामुख्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांमध्ये चर्चा झाली. मुंबईतल्या नेहरू सेंटरमधील या बैठकीत शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे याचसोबत राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि जयंत पाटील तर कॉंग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात याठिकाणी हजर होते.  

या बैठकीत प्रामुख्याने मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवली जातेय. आज अजित पवार यांना बारामतीतून तातडीने बोलावण्यात आलं. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत देखील महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.   

गेल्या काळात शिवसेना आणि कॉंग्रेसकडून मंत्रिपदाबाबत निर्णय घेण्यात आलाय अशी माहिती समोर येत होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटातून मंत्रिपदाबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नव्हती. मंत्रिपदांचं वाटप लवकरात लवकर करायची असल्यास शरद पवार यांच्यासोबत चर्चा होणं महत्त्वाचं होतं. आणि यासंदर्भातील बैठक मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये पार पडली.

उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते जरी या बैठकीतून बाहेर पडले असलेत तरीही, राष्ट्रवादीचे नेते अजूनही नेहरू सेंटरमध्येच आहेत. त्यामुळे आता आजच्या या बैठकीनंतर महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा आणि प्रामुख्याने उपमुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स संपणार का ? हे कदाचित समजू शकेल. 

Webtitle : important meeting is going between sharad pawar and uddhav thackeray

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मी वाचलो पण माझ्या डोळ्यासमोर लोक चिरडले"; प्रत्यक्षदर्शीच्या शब्दात होर्डिंग कोसळल्याची थरारक कहाणी वाचा...

Share Market Closing: शेअर बाजारात मोठी वाढ; सेन्सेक्स-निफ्टी तेजीत, कोणत्या क्षेत्रात खरेदी?

GPT-4o : मैत्रिणीप्रमाणे गप्पा मारतो, व्हिडिओ पाहून सगळं ओळखतो.. Open AIचं सर्वात अ‍ॅडव्हान्स एआय टूल लाँच; पाहा व्हिडिओ

Amey Wagh: "आता कुठल्याही पक्षात जावं आणि कोणाही बरोबर युती करावी..."; मतदानानंतर अमेय वाघची खरमरीत पोस्ट

T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कपच्या शेड्यूलमध्ये गडबड, 24 तासांपेक्षा कमी अंतरात सेमीफायनल अन् फायनल?

SCROLL FOR NEXT