mother corona positive but baby negative 
मुंबई

पालघर: जन्मानंतर बाळाला कोरोना, पण आईचा रिपोर्ट निगेटिव्ह

या केसमध्ये आईला हेपेटायटिस बी ची लागण झाली होती.

दीनानाथ परब

मुंबई: जन्मानंतर अवघ्या काही तासातच एका बाळाला कोरोनाची लागण झाली, तर आईचा रिपोर्ट मात्र कोविड निगेटिव्ह आला. पालघर (palghar) जिल्ह्यात सोमवारी ही घटना घडली. नऊ महिने पूर्ण होण्याआधीच या बाळाचा जन्म झाला. मुंबई बाहेर म्हणजे एएमआर क्षेत्रात जन्मानंतर अवघ्या काही तासात बाळाला कोरोनाची (baby corona) लागण होण्याची ही पहिली घटना असावी. मुंबईत जन्मानंतर अवघ्या काही तासात बाळाला कोरोनाची लागण होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. बहुतांश केसेसमध्ये डिलिव्हरीनंतर आईला सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचं दिसलं आहे. (In Maharashtra palghar baby tests positive after birth though mother is is Corona free)

पालघरमधल्या या केसमध्ये आईला हेपेटायटिस बी ची लागण झाली होती. संबंधित महिला पालघरच्या दारशेठ गावची रहिवाशी आहे. सोमवारी तिला प्रसुती कळा सुरु झाल्या. तिला आठवा महिना सुरु होता. तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिने दीड किलो वजनाच्या एका मुलीला जन्म दिला. काही तासांनी डॉक्टरांनी बाळाची कोविड चाचणी केली. त्यात नुकत्यात जन्मलेल्या मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तर आईचा रिपोर्ट् निगेटिव्ह होता. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

डॉक्टरांनी अधिकाऱ्याना याची माहिती दिली व मुलीला जवाहरच्या सरकारी रुग्णालयात हलवले. बाळाला आयसीयूमध्ये ठेवले असून त्याची प्रकृती स्थिर आहे, वडिलाचे नमुने सुद्धा चाचणीसाठी घेतले आहेत, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मारद यांनी सांगितले. बाळ आईच्या पोटात असताना, आईकडून बाळाला कोरोनाची कशी लागण होते, त्या संदर्भात संशोधन सुरु आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. मुंबई सेंट्रल येथील नायर हॉस्पिटलमध्ये कोविड पॉझिटिव्ह गर्भवती महिलांसाठी उपचारांची व्यवस्था आहे.

मागच्यावर्षीपासून आतापर्यंत १ हजार मातांनी बाळाला जन्म दिला आहे. २०२० मध्ये ७६१ बाळांचा जन्म झाला. त्यात ३७ अर्भकांना कोरोनाची लागण झाली. २०२१ मध्ये २०२ बाळांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला, त्यात नऊ बाळं पॉझिटिव्ह आढळली. जन्मानंतर रुग्णालयाकडून बाळांची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आली.

कोरोना आणि बालरुग्ण... आरोग्य विभागाची महत्त्वाची माहिती

महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या सहा महिन्यात आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या (Corona Cases) आकडेवारीचे विश्लेषण केले असता लहान मुलांमध्ये (Kids) कोरोनाचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात फारसा बदल आढळून आला नाही, असे आरोग्य विभागाने (Health Department) स्पष्ट केले आहे. कोरोनाला बळी पडलेल्या 18 वर्षांखालील मुलांचे प्रमाण मे 2021 मध्ये सुमारे 0.07 टक्के इतके आहे. यावरून लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT