Crime News Google
मुंबई

भयानक! बक्षीस दिलं नाही, मुंबईत तृतीयपंथीयाने तीन महिन्याच्या बाळाची केली हत्या

कफपरेड येथील आंबेडकर नगरच्या मागील खाडीत बाळाला जिवंत पुरलं.

सुरज सावंत

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. आतापर्यंत आपण मुंबईतील रुग्णालयातून (Mumbai hospital) बाळ पळवल्याबद्दल (child theft) ऐकलं आहे. पण काल रात्री मुंबईच्या कफ परेड परिसरातून (cuffe parade area) एका घरातून तीन महिन्याचं बाळ पळवण्यात आलं. त्यानंतर त्या बाळाची हत्या (murder) करण्यात आली. रात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली. आंबेडकर नगरमध्ये एका घरातून तीन महिन्याच्या चिमुकलीला पळवण्यात आलं होत. घरात बाळाचा जन्म झाल्यानंतर अनेकदा तृतीयपंथीय (eunuch) दरवाजावर येऊन पैसे मागतात. (In mumbai cuffe parade area three month old baby killed by eunuch)

कफपरेड आंबेडकर नगरमध्ये राहणाऱ्या बाळाच्या घरी सुद्धा एक तृतीयपंथीय पोहोचला. बक्षिसात पैसे दिले नाहीत, म्हणून या तृतीय पंथीयाने तीन महिन्याच्या मुलीची हत्या केली. मुलगी झाली म्हणून तृतीयपंथीय बक्षीस मागण्यासाठी गेला होता. त्यांनी मुलीच्या पालकांकडे एक साडी एक नारळ आणि अकराशे रुपयाची मागणी केली.

रात्री ९.३० च्या सुमारास बक्षीस मागण्यासाठी म्हणून तो घरी गेला होता. परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्या तृतीयपंथीयांची मागणी मुलीचे पालक पूर्ण करू शकले नाही. त्याचा राग मनात धरून तृतीयपंथीय तिथून निघून गेला.

रात्री २ ते ३ च्या सुमारास आपला जोडीदार सोनू सोबत तृतीयपंथीय तिथे गेला आणि त्या मुलीचं अपहरण केलं. अपहरण करून त्या मुलीला कफ परेड येथील आंबेडकर नगरच्या मागील खाडीत जिवंत पुरलं. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आणि तात्काळ प्रभावाने या दोघांना अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Crisis : मुंबईवर अभूतपूर्व पाणी संकट ! जलाशयांत केवळ १० टक्के पाणीसाठा; बांधकाम, जलतरणचा पाणीपुरवठा आजपासून बंद

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

PM Kisan 23rd Installment: 23व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली! 2,000 रुपये कधी खात्यात येणार? थेट कृषिमंत्र्यांनीच सांगितली तारीख

SC Reservation Subclassification : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत एक लाखांहून अधिक हरकती, सरकार घाईगडबडीत निर्णय घेणार नाही; मंत्री शिरसाट यांची ग्वाही

Satara Accident: दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्याचे स्वप्न अधुरे! बनपुरीजवळ दुचाकी-पिकअपची समोरासमोर धडक; १६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT