मुंबई

धक्कादायक! वडिलांनीच मुलाची पाण्यात तोंड बुडवून केली हत्या

घरातील सर्व सदस्य झोपलेले असताना...

सुरज सावंत

मुंबई: मुलुंडमध्ये वडिलांनीच (mulund area) आपल्या गतिमंद मुलाची राहत्या घरी हत्या (murder) करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलुंडच्या क्राऊन्स ज्वेल्स, योगी हिल्स, मुलुंड परिसरात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. योगेश दशरथ भट्ट असे मृत मुलाचे नाव असून दशरथ गुणवंत राय असे आत्महत्या (suicide) करणाऱ्या वडिलांचे नाव आहे. (In Mumbai mulund area first father killed son & then himself done suicide)

योगेश हा जन्मापासून गतिमंद होता. योगेश कुठलीही गोष्ट स्वत: करू शकत नव्हता. त्याच्यावर विविध रुग्णालयात उपचार ही करण्यात आले. मात्र योगेशमध्ये काही फरक पडला नाही. भविष्यात योगेशचे कसे होईल या चिंतेने दशरथ यांनी शनिवारी मध्यरात्री घरातील सर्व सदस्य झोपलेले असताना योगेशला त्याच्या खोलीतील धान्य साठवण्याच्या पत्र्याच्या डब्यात पाणी साठवून त्यात योगेशचे तोंड बुडवून हत्या केली.

त्यानंतर दशरथ यांनी स्वत: घरातल्या हाँलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून मुलुंड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दशरथ यांच्या मृतदेहाजवळ सुसाइड नोट मिळाली असून त्यात योगेशच्या हत्येचे आणि स्वत:च्या आत्महत्येचे कारण लिहिले आहे. भविष्यात योगेशचे कसे होईल म्हणून त्याची हत्या करून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी मुलुंड पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT