ठाणे ः ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतदेखील कमालीची वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सध्याच्या घडीला 78 हजार 567 रुग्णांपैकी आतापर्यंत 52 हजार 724 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे हे प्रमाण रुग्णसंख्येच्या 67.11 टक्के इतके आहे.
ठाणे जिल्ह्यात जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात कोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दिवसाकाठी एक हजार 800 ते दोन हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत होते; मात्र मागील चार ते पाच दिवसांपासून या रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने प्रतिदिन एक हजार 400 ते एक हजार 700 नवे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. असे असले तरी जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात रविवारपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 78 हजार 567 वर पोहचली आहे. त्यापैकी 52 हजार 724 म्हणजेच 67.11 टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे; तर सध्याच्या घडीला 23 हजार 690 म्हणजेच केवळ 30.15 टक्के इतके रुग्ण उपचारार्थ जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत दाखला आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 153 रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाला असून हे प्रमाण 2.74 टक्के इतके आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांपैकी बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याची बाब दिलासादायक असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याकडे प्रशासन विशेष लक्ष देत असल्याचे यावरून दिसून येत आहे.
ठाणे जिल्ह्यात आढळणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची रोगप्रतिकारक शक्तीही चांगली आहे. तसेच त्यांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा पुरवल्या जात असल्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सक्षम आरोग्य व्यवस्था उभारण्यात आली आहे.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे
Increase in the number of corona free patients in Thane district
( संपादन ः रोशन मोरे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.