मुंबई

लोकल रेल्वे गाड्यांची संख्या वाढवावी, मुंबई उच्च न्यायालयाची सरकारला सूचना

- सुनीता महामुणकर

मुंबई, ता. 7 : राज्यातील सध्याची परिस्थिती ही अंशतः लॉकडाऊनची आहे. त्यामुळे रेल्वेगाड्यांमधील गर्दीही वाढत आहे. अशावेळी वाढत्या गर्दीचा विचार करता रेल्वेगाड्यांची संख्या वाढवावी, अशी सूचना आज मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली.

मॉल्स, हॉटेल्स खुले करण्यात आलेत. सरकारी कार्यालयात सर्व कर्मचारी असतात आणि अन्य सर्व क्षेत्रही खुली झाली आहेत.लॉकडाऊनच्या या अंशतः परिस्थितीमध्ये रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी वाढली आहे. त्यामुळे सुरळीत होणारी परिस्थिती आणि रेल्वे गाड्या यांचा समन्वय होणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने सुचविले.

वकिलांना रेल्वे गाडीतून प्रवास करण्यासाठी ऍडव्होकेट उदय वारुंजीकर यांच्या मार्फत करण्यात आलेल्या जनहित याचिकांंवर आज मुख्य न्या. दिपांकर दत्ता आणि न्या गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रेल्वे गाड्या वाढविण्याची गरज आहे. आम्ही याबाबत राज्य सरकारला आदेश देऊ शकत नाही. मात्र राज्य सरकार आमच्या सूचनांचा विधायक दृष्टिकोनातून विचार करून रेल्वे विभागाकडे याबाबत प्रस्ताव देण्याबाबत विचार करेल, असा विश्वास आहे, असेही न्यायालय म्हणाले. मध्य रेल्वेवर 600 तर पश्चिम रेल्वेवर 700 गाड्या असाव्यात, असेही खंडपीठाने सुचविले.

सध्या उच्च न्यायालयाने प्रत्यक्ष सुनावणीला प्रारंभ केला आहे. मात्र मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमधील किती वकील प्रत्यक्ष सुनावणीला रेल्वेने प्रवास करून हजर राहतील, याची माहिती दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने वकिल संघटनांना दिले आहेत. याचिकेवर पुढील सुनावणी ता. 9 रोजी होणार आहे.

increase rides of mumbis lifeline mumbai local trains bombay high court to state government

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT