मुंबई

"अ‍ॅप बेस्ड' वाहन चालकांच्या कर्जावरील व्याज माफ करावे"

Indian Federation of App Based Transport Workers संघटनेची मागणी

प्रशांत कांबळे

मुंबई: राज्य सरकारने रिक्षा चालकांना 1500 रुपये अर्थसहाय्य देण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र, अँप बेस्ड (App Based) टॅक्सी चालकांची आर्थिक परिस्थिती सुद्धा अत्यंत बिकट आहे. कोरोना काळात (Coronavirus) संपूर्ण व्यवसाय ठप्प झाल्याने बँकेच्या कर्जाचे हफ्ते फेडण्याची सुद्धा नाही. मात्र बँकांकडून कर्जाचे आणि त्याच्या व्याजाचा (Interest) तगादा लावला जात असल्याने राज्य सरकारने प बेस्ड टॅक्सी चालकांच्या कर्जावरील व्याज 100 टक्के माफ करण्याची मागणी इंडियन फेडरेशन ऑफ अ‍ॅप बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्सचे (Indian Federation of App Based Transport Workers) राष्ट्रीय अध्यक्ष प्रशांत सावर्डेकर यांनी केली आहे. (Indian Federation of App Based Transport Workers demands exemption in Interest on Vehicle loans)

राज्यभरातील ओला, उबर, रिक्षा, टेम्पो, लोकल टॅक्सी यांची स्थिती नवीन टाळेबंदीच्या निर्णयानंतर अधिक बिकट झाली आहे. महाराष्ट्र अ‍ॅप बेस्ड वाहतूक कामगार युनियन, रिक्षा पंचायतीने MMR विभाग पुणे, पिंपरी चिंचवड, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूर येथील परिस्थितीचा आढावा घेतला असून, अँप बेड टॅक्सी चालकांच्या प्रलंबित मागण्या राज्य सरकारने मान्य करण्याची गरज आहे.

अ‍ॅप बेस्ड वाहन चालक मालकांच्या कर्जावर असलेल्या सर्व वाहनांचे विम्याचे हफ्ते माफ करणे, त्यासाठी सर्व विमा कंपन्यांना त्वरित शासनाने आदेश देऊन कर्जावरील 100 टक्के व्याज माफ करावे. त्यासोबतच, त्वरित लसीकरण देण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या आहे. त्यासोबतच उबर कंपनीने सुरुवातीला त्यांच्या कामगारांना लसीकरण मोहिमेची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात लसीकरण सुरू केले नाही. त्यामुळे राज्य सरकारने ऍप बेस्ड चॅनल मालकांना सुद्धा लसीकरण देण्याची मागणी प्रशांत सावर्डेकर यांनी केली आहे.

कोरोना कालावधीत वाहन जप्ती थांबवा

आरटीओशी संबंधित सर्व कागदपत्रांची तपासणी, नूतनीकरण (विम्यासह) एका वर्षासाठी केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे. मात्र, अँप बेस्ड चालकांवर चुकीची कारवाई केली जात आहे. त्यासोबतच मोटार वाहन कायद्यांतर्गत 500 रुपये प्राधिकरण फी बदलून 25 हजार केलेली दंडाची रक्कम सुद्धा अन्यायकारक असल्याने अशा कामगार विरोधी धोरणामध्ये बदल करण्याची मागणी सुद्धा सावर्डेकर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

National Herald Case Update : 'नॅशनल हेराल्ड' प्रकरणात राहुल गांधी अन् सोनिया गांधींना मोठा धक्का!

Alcohol Limit Act: पार्टीत अडचण नको! घरी किती मद्य ठेवणे कायदेशीर आहे? नववर्षाच्या सेलिब्रेशनपूर्वी नियम जाणून घ्या

Shirpur Municipal Election : शिरपूरमध्ये 'पटेल' पॅटर्नचा झंझावात! ३२ पैकी ३१ जागा जिंकत भाजपची एकहाती सत्ता, चिंतन पटेल नगराध्यक्ष

Latest Marathi News Live Update : जालन्यात पैशाच्या वादातून तरुणाची गोळी झाडून हत्या

Municipal Council Election: गड राखला; पण नगराध्यक्ष गमावला! भाजपला उरण नगर परिषदेतील सत्ता राखण्यात यश

SCROLL FOR NEXT