मुंबई

रेमडेसिवीर कोरोनासाठी कुचकामी! जागतिक आरोग्य संघटनेचा निष्कर्ष

मिलिंद तांबे



मुंबई: रेमडेसिवीर इंजेक्‍शन कोरोनासाठी कुचकामी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) म्हटले आहे. काही देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळे भारतात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या या इंजेक्‍शनच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

कोरोनाबाधित रुग्णांवर जगभरात रेमडेसिवीर, लोपोनाईल, रोटोनाईल ही औषधे वापरली जात होती. रेमडेसिवीरमुळे रुग्ण लवकर बरा होतो. तसेच मृत्युदरातही घट होत असल्याचे सांगितले जात होते; मात्र ही औषधे कोरोनासाठी कुचकामी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच जाहीर केले. त्यामुळे ही औषधे वापरायची की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 70 देशांतील 250 रुग्णालयात एकता चाचणी घेतली. या चाचणीमध्ये त्यांनी कोरोनावर वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर, इंट्रोफिरॉन, लोपोनाईल, रोटोनाईल, टॉसिलीझुमॅब या औषधांची उपयुक्तता तपासली. त्यातील हाड्रोक्‍सीक्‍लोरोक्वीन आणि लोपोनाईल, रोटोनाईल ही औषधे जूनमध्येच बंद करण्यात आली; तर रेमडेसिवीर आणि इंट्रोफिरॉन औषधे ही कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त नसल्याचे समोर आले आहे. 

कोरोना संसर्गावर सध्या ठोस औषध नसले तरी रेमडेसिवीर, हायड्रॉक्‍सीक्‍लोरोक्वीन, टॉसिलीझुमॅब, इटॉलिझुमॅब, लोपोनाईल, रोटोनाईल ही औषधे वापरली जात होती. त्यातील एकही औषध कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही औषधे कोरोना रुग्णांसाठी वापरणे काहीही उपयोगाचे नसल्याने रुग्णांसाठी ऑक्‍सिजनची व्यवस्था तसेच स्टोरॉईडचा वापर करणे अधिक गरजेचे आहे. 
- डॉ. ईश्वर गिलाडा,
संक्रमण रोगतज्ज्ञ 

जागतिक आरोग्य संघटनेच्या निष्कर्षामुळे रुग्णांच्या उपचारासाठी नेमके कोणते औषधे वापरायचे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. भारतात रेमडेसिवीर इंजेक्‍शनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या इंजेक्‍शनमुळे रुग्णाला बरे वाटत असल्याचा अनेक डॉक्‍टरांचा निष्कर्ष आहे. कोरोनावर ठोस औषध येईपर्यंत हे औषध वापरण्याशिवाय पर्याय नाही. 
- डॉ. अविनाश भोंडवे,
अध्यक्ष, भारतीय वैद्यकीय संघटना (महाराष्ट्र) 

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२८ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट इतिहासात घडणार दुर्मिळ क्षण? एकाच दिवशी दोन देशात कसे खेळणार भारतीय संघ

Vadodara Mumbai Expressway : महाराष्ट्रातून दिल्ली अन् जयपूर गाठणे होणार सोपे! वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेचा 'हा' मार्ग वाहतुकीसाठी सज्ज; PM मोदींच्या हस्ते उद्घाटन

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

SCROLL FOR NEXT