Dengue-malaria patients
Dengue-malaria patients sakal media
मुंबई

मुंबईत साथीच्या आजारांचा 'ताप';आरोग्य विभागाची वाढतेय डोकेदुखी

भाग्यश्री भुवड

मुंबई : ओमिक्राॅन (Omicron variant) पाठोपाठ साथीच्या आजारांचे (infectious diseases) संकट मुंबईवर (Mumbai) कायम असून सर्दी, खोकल्याच्या तक्रारींनी (cold and cough complaints) मुंबईकर त्रस्त आहेत. मुंबईत 10  दिवसांत मलेरिया (Malaria), डेंग्यूसह (Dengue) गॅस्ट्रोच्या रुग्ण (Gastro patients) संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. (Infectious diseases increases in mumbai big tension for health department)

कोरोना, ओमिक्राॅन विषाणूला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने युद्धपातळीवर नियोजन सुरु केले असतानाच साथीचे आजार बळावत आहेत . गेल्या 10 दिवसांत म्हणजेच 21 ते 31 डिसेंबर महिन्यात मलेरियाचे 288, गॅस्ट्रोचे 433 तर डेंग्यूच्या 40 नवीन रुग्णांची नोंद झाल्याने मुंबईत साथीच्या आजारांचे संकट कायम आहे.

मुंबईत कोरोनाची तिसरी लाट धडकली असून कोरोनाचा नवीन हेरिएंट ओमायक्राॅन विषाणुही वेगाने पसरतोय. त्यामुळे, कोरोनासह नवा ओमायक्राॅन विषाणू विरोधातील लढ्यात वाढत्या साथीच्या आजारांची चिंता पालिकेच्या आरोग्य विभागाची डोकूदुखी वाढवत आहे.

एच1एन1 आटोक्यात

दरम्यान, एच वन एन वन रुग आटोक्यात असून गेल्या 10दिवसांत एकही स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळलेले नाही, असे पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

10 दिवसांत आढळलेले रुग्ण

मलेरिया - 288

लेप्टोस्पायरोसिस- 4

गॅस्ट्रो - 433

डेंग्यू - 49

कावीळ - 37

चिकनगुनिया - 12

लेप्टो - 4

एच1एन1 - 0

मृत्यू नियंत्रणात

दरम्यान, गेल्या संपूर्ण वर्षात साथीच्या आजारांमुळे पालिकेने 7 मृत्यू नोंदवले जे 2020 च्या तुलनेत कमी आहेत. 2020 मध्ये एकूण 12 मृत्यू नोंदवण्यात आले होते.   त्यामुळे रुग्ण संख्या जरी वाढत असली तरी मृत्यू नियंत्रणात ठेवण्यात पालिकेला यश आले आहे.

सर्दी खोकला, तापाची ओपीडी वाढली

मुंबईतील पालिकेच्या कान-नाक-घसा या रुग्णालयातील ओपीडी सध्या वाढली आहे. सर्दी, खोकल्यासह तापाचे रुग्ण वाढू लागले आहेत. दररोज किमान 350 च्या वर ओपीडीत रुग्ण दाखल होत असून सर्दीमुळे कानाचे विकार वाढले आहेत अशी माहिती कान-नाक-घसा रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपिका राणा यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT