मुंबई

Inside Story : आपल्या शिंकेतून एका सेकंदात इतक्या दूरवर जातो कोरोनाचा विषाणू

सुमित बागुल

मुंबई - जगभरात कोरोना थैमान घालतोय. अशात भारतात देखील कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतायत. भारतात अनेक देशांच्या तुलनेत आधीच लॉकडाऊन सुरु झाल्याने भारतातील रुग्णसंख्या आटोक्यात असल्याचं सरकार आणि आरोग्य यंत्रणांकडून सांगण्यात येतं. अशात कोरोनाला दूर ठेवण्यासाठी फिजिकल डिस्टंसिंग अत्यंत महत्त्वाचं आहे. भारतात तर 'दो गज की दुरी, रखना है जरुरी; अशा उद्घोषणा देखील फेमस झाल्यात. अशात दो गज म्हणजे ६ फुटांचं अंतर कोरोनाला दूर ठेवण्यासाठी पुरेसं नाहीये. याबाबत अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये एक अभ्यास  करण्यात आला आहे. यामध्ये खोकला किंवा शिकल्यामुळे कोरोना विषाणू तब्ब्ल २० फूट दूर जाऊ शकतो असं म्हटलंय 

अमेरिकेतील 'सेंटा बार्बरा'मधील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या अभ्यासकांच्या मते नॉवेल कोरोना व्हायरस अनुकूल परिस्थितीत तीन पट जास्त दूरवर पसरू शकतो. या आधी झालेल्या एका अभ्यासाच्या हवाल्याने या नवीन रिसर्चमध्ये शिंकेतून तब्बल ४० हजार ड्रॉपलेट्स तयार होऊ शकतात असं सांगितलंय. यामध्ये शिंक आल्यावर त्याचा सुरवातीचा वेग हा प्रति सेकंद १ मीटर पासून प्रति सेकंड १०० मीटर एवढी देखील असू शकते असं बोललं जातंय.

कोरोना व्हायरसचा एरोडायनॅमिक आकार त्याचसोबत 'हीट आणि मास प्रेसेस' नुसार हा व्हायरस किती दूरवर जाऊ शकतो याबाबत  निष्कर्ष काढण्यात आलाय.   

आपल्या आसपास असणारं वातावरण, उष्णता, हवेतील आर्द्रता, तापमान, यासोबत गणितीय मॉडेलचा वापर करून श्वासातून किंवा शिंक किंवा खोकल्यातून निघणाऱ्या ड्रॉप्लेट्समधून विषाणूंचा प्रसार किती दूरवर होऊ शकतो याबद्दल medrXiv या मासिकात माहिती दिली गेलीये. यामध्ये आपल्या आसपास असणाऱ्या व्यक्तींना झालेला संसर्ग याला 'ट्रान्समिशन' आणि दूरवरील व्यक्तींना झालेला संसर्ग म्हणजे 'एअरसोल एक्सपोजर' असं म्हटलंय. 

यामध्ये अभ्यासकांनी असंही म्हटलंय, CDC म्हणजेच सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अनुसार सहा फुटांचं अंतर राखलं जावं अशी माहिती दिली गेलीये. मात्र अभ्यासकांच्या मते अनुकूल वातावरणात आपल्या शिंकेतून निघणारे ड्रॉप्लेट्स हे ६ मीटर दूरवर जाऊ शकतात.  

अभ्यासकांच्या मते फेस मास्क वापरून आपण कोरोना संक्रमण होण्यापासून दूर राहू शकतो, मात्र फिजिकल डिस्टंसिंग हाच उत्तम पर्याय असल्याचं त्यांनी म्हटलंय.   

inside story on how far corona could travel when a person sneeze on cough

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT