ठाणे धोकादायक इमारती. 
मुंबई

ठाणे महापालिका अधिकारी ऑनफिल्ड ; धोकादायक इमारतींचा नव्याने आढावा 

राजेश मोरे

ठाणे  ः महाडमधील इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. अशी दुर्घटना पुन्हा घडू नये म्हणून प्रशासन काळजी घेत आहे. त्यातच ठाणे महापालिका क्षेत्रात संततधार पावसाने धोकादायक इमारत कोसळण्याची घटना टाळण्यासाठी महापालिकेच्या वतीने नव्याने अशा इमारतींची पाहणी केली जात आहे. आज सकाळपासूनच पालिका अधिकाऱ्यांना प्रत्यक्षात धोकादायक इमारतींची पाहणी करण्यास सुरुवात केली.


 ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार महापालिका आयुक्त डॉ. शर्मा आज सकाळी आठ वाजल्यापासून शहरातील परिस्थितीचा आढावा घेत असून त्यांनी प्रभाग समिती यंत्रणा अलर्ट ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रभागातील धोकादायक इमारतींची पाहणी करून त्या तत्काळ रिकाम्या करण्याचे आदेश शर्मा यांनी दिले आहेत. त्यानुसार सकाळी आठ वाजल्यापासूनच आपल्या प्रभागातील धोकादायक इमारती आणि इतर गोष्टींची पाहणी केली. 

- यंत्रणा सतर्क 
शुक्रवारी अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व अधिकाऱ्यांना आपापल्या प्रभाग समितीअंतर्गत धोकादायक इमारतींची पाहणी करणे, झाडे पडणे, दरड कोसळणे, चेंबर कव्हर तुटणे आदींची पाहणी करून त्याबाबत तत्काळ पुढील आवश्‍यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्याची अंमलबाजवणी संबंधित अधिकाऱ्यांकडून सुरू करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी अन्य इमारती धोकादायक स्थितीत आहेत किंवा नाहीत, याचीही खातरजमा केली. यापूर्वी ठाण्यात धोकादायक इमारत कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या वतीने नव्याने काळजी घेतली जात आहे. 

(संपादन ः रोशन मोरे)

Inspection of old buildings by Thane Municipal Corporation officials

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्माचे शतक! शुभमन गिलसोबत विक्रमी भागीदारी; गांगुली-तेंडुलकर यांचा १९९८ चा विक्रम संकटात...

Satara DJ Rules: सण-उत्सवात डीजेचा आवाज वाढवला तर खिसा रिकामा! व्यक्तीला ५० हजार, मंडळांना १ लाखांची अनामत

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

SCROLL FOR NEXT