मुंबई

प्रेरणादायी! मुंबईत 100 वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. त्यातच मृत्यूचं प्रमाणही वाढतंय. पण या वाढत्या आकड्यासोबत रुग्ण बरे होण्याच प्रमाणही जास्त आहे. अशातच मुंबईत एका 100 वर्षींय आजोबांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवार हा घाटकोपरच्या राजावाडी रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी एक खास दिवस ठरला. कारण 100 वर्षीय रामलाल माळी यांनी कोरोना व्हायरससारख्या भयंकर रोगाच्या लढाईला यशस्वीपणे मात केली.

20 दिवस रूग्णालयात घालवलेल्या माळी काही दिवस आयसीयूमध्ये होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर पुन्हा कुटुंबाला भेटायला मिळेल की नाही यांची त्यांना खात्री नव्हती. काल रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर व्हिलचेअरवर बसलेल्या माळींना वॉर्डबाहेर काढताच त्यांच्यावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

माळी हे पत्नी आणि दोन मुलींसोबत विक्रोळी पार्क साईटच्या वर्षा नगर येथील साईनाथ नगर सोसायटीत राहतात. ते बहुतेक वेळा घरातच असायचे. मे महिन्यात त्यांना थंडी भरुन यायची तसंच त्यांना तापही आला. 20 मे रोजीपर्यंत त्यांची भूकही कमी झाली होती आणि त्यांना दम देखील लागायचा. त्यानंतर त्यांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथे 25 मे रोजी त्यांची कोविड 19 ची टेस्ट पॉझिटिव्ह आली. मग माळी यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले.

माळी यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर राजावाडी रुग्णालयाच्या डीन डॉ. विद्या ठाकूर यांनी सांगितलं की, त्यांची प्रकृती खालावत चालली होती, त्याची नाडी (pulse) ऑक्सिजन 80 टक्क्यांपर्यंत खाली आला आणि हे त्या व्यक्तीच्या आयुष्यासाठी घातक ठरण्याची शक्यता असते. त्यानंतर त्यांना ऑक्सिजन आणि लक्षणात्मक उपचार दिले जात होते. माळी यांनी उपचारांना चांगला प्रतिसाद दिला आणि आता याचे परिणाम आपल्यासमोर असल्याचं डॉ. ठाकूर यांनी म्हटलं आहे. कोरोना व्हायरस सारख्या रोगाची सर्वात वाईट बाजू पाहिलेले कर्मचारी माळी ठिक झाल्यानंतर संपूर्ण कर्मचारी खूष झाले, असंही त्या पुढे म्हणाल्या. 

माळी रूग्णालयातून बाहेर आल्यावर रहिवाशांनी आणि स्थानिक राजकारण्यांनी जल्लोष केला. माळी हे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. ते खूप वर्षांपूर्वी मुंबईत आले आणि त्यांनी फुलं आणि हारे विक्रीचा व्यवसाय केला.

आमच्यासाठी खूप कठीण काळ होता. त्यांची कोरोना व्हायरसची टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि आम्हाला क्वांरटाईन करण्यात आलं. ते दररोज काय करतात ते कसे आहेत हे आम्हाला माहित नव्हते. मात्र डॉक्टर प्रत्येक दोन दिवसांनी आम्हाला त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट देत होते, असं माळी यांची मुलगी मुनका यांनी सांगितलं. जेव्हा आम्हाला कळले की ते बरा झालेत आणि त्यांना लवकरच डिस्चार्ज दिला जाईल, तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

मला खात्री नव्हती की मी त्या रुग्णालयातून जिवंत बाहेर येईन की नाही ते. हे माझ्यासाठी बोनस आयुष्य आहे, मी सर्व डॉक्टर आणि कर्मचार्‍यांचे आभारी असल्याचं माळी यांनी म्हणालेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: ... तर महेंद्रसिंग धोनी CSK संघातील जागा अडवतोय! एबी डिव्हिलियर्स म्हणाला, निवड गुणवत्तेच्या आधारावर झाली पाहिजे

Nashik IVF Centers : स्त्रीबीज तस्करीचे धागेदोरे नाशिकमध्ये! महापालिकेकडून १२ आयव्हीएफ सेंटर्सची तपासणी पूर्ण

Konkan Project : पोयनार, न्यू मांडवे धरणांना मान्यता; मंत्री कदम, पोयनारला २६५, न्यू मांडवेला १९५ कोटी

Nashik Municipal Corporation : नाशिकच्या २४ खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार! महापालिका अंदाजपत्रकात 'खेडे विकास निधी'ची तरतूद

'यापेक्षा पॉर्न बरं असतं' नोरा फतेहीच्या गाण्यावर भडकले नेटकरी, म्हणाले...'शब्द असे की...'

SCROLL FOR NEXT