मुंबई

सरसकट लोकल प्रवासासाठी सामान्य प्रवासी प्रतिक्षेतच, राज्य आणि रेल्वे प्रशासनाकडून टोलवाटोलवी

प्रशांत कांबळे

मुंबई: राज्याने सरसकट लोकल प्रवासाचा प्रस्ताव रेल्वेला पाठवला होता. मात्र, 22 लाखांपेक्षा जास्त प्रवाशांच्या गर्दीची जबाबदारी रेल्वे घेणार नसून, यासंबंधित गर्दीच्या नियोजनासाठी उपाययोजना सुचविण्याचे रेल्वेने राज्य सरकारला उत्तर दिले. त्यावर राज्य सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही आहे. राज्य आणि रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत वादात, सरसकट लोकल प्रवासाची सामान्य प्रवाशांना प्रतिक्षाच पाहावी लागते आहे. 

कोरोनाच्या माहामारीमुळे गेल्या सात महिन्यांपासून लोकलची सेवा सर्वसामान्यांसाठी बंद आहे. सुरूवातीला अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची सुविधा सुरू केली होती. त्यानंतर हळुहळू इतर कर्मचारी आणि सरसकट महिलांना नियोजित वेळेत लोकल प्रवासाचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, यासंदर्भातील श्रेय वादामुळे आणि कोरोनाचा संसंर्ग वाढण्याच्या भीतीमुळे अद्याप राज्य किंवा रेल्वे मंत्रालय सरसकट प्रवाशांसाठी सक्षम निर्णय घेताना दिसून येत नाही. 

आधीच लॉकडाऊनमूळे अनेकांचे खासगी काम बंद पडले आहे. कोणतेही उत्पन्न नसल्याने कुटुंबाची उपासमारीची वेळ आली आहे. हाताला काम नाही, तर घरात पैसे नसल्याने आता सामान्य नागरिक घराबाहेर पडू लागले आहे. मात्र, सर्वसामान्यांची लोकल बंद असल्याने, प्रवासासाठीच पैसे मोजावे लागत आहे. कोरोना विषाणूच्या भितीने काम ही मिळत नसल्याने सर्वसामान्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. 

अनलॉक अंतर्गत लोकल सेवा पुर्ववत सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचेच नियोजन आवश्यक होते. मात्र, राज्य सरकार विरूद्ध रेल्वे मंत्रालयांच्या आंतर्गत संघर्षात सर्व सामान्य लोकल प्रवासी अडचणीत सापडतो आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने सरसकट रेल्वे प्रवासाबद्दल त्वरीत निर्णय घेणे आवश्यक आहे. अन्यथा सामान्यांच्या असंतोषाचा स्फोट होण्याची शक्यता आहे.
श्याम उबाळे, अध्यक्ष, कल्याण कर्जत कसारा रेल्वे प्रवासी संघटना

सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करताना, रेल्वे आणि राज्य सरकारने एकत्र येऊन आधीच नियोजन करणे आवश्यक होते. त्यासंबंधीत तज्ज्ञांना, रेल्वे प्रवासी संघंटनांची मत घ्यायला पाहिजे होते. मात्र, तसे झाले नसल्याने, त्यामुळे लोकल सरसकट सुरू केल्यास गर्दीतून कोरोना विषाणूचा फैलाव होण्याच्या भीतीमुळे राज्य किंवा रेल्वे मंत्रालय सरसकट प्रवाशांसाठी लोकल सुरू करण्याचा सक्षम निर्णय घेत नाही. मात्र, यामध्ये सामान्य प्रवाशांचे नुकसान होत आहे. 
मधू कोटीयन, अध्यक्ष, मुंबई रेल्वे प्रवासी संघटना

-------------------

(संपादनः पूजा विचारे)

Internal dispute between state and railway ministry ordinary commuters have wait entire local journey

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT