intuc organization controversy in industrial court akash chajed Cancellation of facilities for ST Corporation esakal
मुंबई

Mumbai News : अधिकृत इंटक संघटनेचा वाद औद्योगीक न्यायालयात; एसटी महामंडळाकडून मिळणाऱ्या सुविधा रद्द

छाजेड यांचा मुलगा आकाश छाजेड यांनी संघंटनेचा नविन अध्यक्ष आपणच असून, तसे पत्र एसटी महामंडळाला दिले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघंटनेचे माजी अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांच्या मृत्युनंतर संघंटनेच्या नेतृत्वावरून वाद निर्माण झाला आहे. छाजेड यांचा मुलगा आकाश छाजेड आणि सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी वेगवेगळे पत्र एसटी महामंडळ प्रशासनाला देऊन अधिकृत संघंटना आमचीच असा दावा केला,

दरम्यान छाजेड यांनी अधिकृत संघंटना कोणती हे ठरविण्याचे अधिकार औद्योगीक न्यायालयांना असल्याची तक्रार एसटी प्रशासनाकडे केल्याने इंटक संघंटनेला महामंडळाकडून मिळणाऱ्या सुविधा तुर्तास रद्द करण्यात आल्या आहे.

एसटी महामंडळात काम करणारी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघंटनेचे तत्कालीन अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांच्या निधनानंतर संघंटनेत दोन गट पडले आहे. छाजेड यांचा मुलगा आकाश छाजेड यांनी संघंटनेचा नविन अध्यक्ष आपणच असून, तसे पत्र एसटी महामंडळाला दिले आहे.

तर सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी जयप्रकाश छाजेड यांना काढण्याचा ठरावा आधीच घेण्यात आल्याचे सांगितले होते. तिगोटे गटाने एसटी महामंडळाची दिशाभूल केल्याने एसटी महामंडळाने तिगोटे यांच्या गटाला महामंडळाच्या सुविधा देण्याचे परिपत्रक काढले होते.

त्यामूळे छाजेड यांनी कामगार आयुक्त आणि एसटी महामंडळ प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यावरून कामगार आयुक्तांनी कोणतीही मान्यता दिली नसल्याचे पत्र एसटी महामंडळाला दिले आहे.

त्यावरून आता एसटी महामंडळाने मुकेश तिगोटे यांच्या गटाच्या सुविधा काढून टाकण्याचे आदेश दिले असून अधिकृत कार्यकारीणीचा न्याय निवाडा येईपर्यंत महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघंटनेला कोणत्याही सवलती देण्यात येऊ नये असे आदेश देण्यात आले आहे.

महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटना दिवंगत माजी आमदार जयप्रकाश छाजेड व सरचिटणीसदी ए लीपने पाटील यांनी स्थापन केली.परंतु काही पदाधिकाऱ्यांनी विरोधी भूमिका घेत स्वतःच्या स्वार्थासाठी संघटना फोडण्याचे काम केले. यापुढे महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस कामगारांच्या हितासाठी नवीन उभारी घेऊन कार्यरत राहू, एसटी महामंडळाच्या परिपत्रकामूळे सत्तेचा विजय झाला आणि डुप्लिकेट संघटनेला त्यांची जागा दाखवुन दिली.

- आकाश छाजेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China agreement : भारत-चीन करारामुळे नेपाळ संतप्त, डिप्लोमॅटिक नोट पाठविण्याची तयारी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 21 ऑगस्ट 2025

Israel War On Gaza: गाझातील इस्राइल करीत असलेला नरसंहार त्वरित थांबवा, सर्वपक्षीय नेत्यांची मागणी

गोष्ट एका ‘शिदोरी’ची

बोलताना ठेवा भान

SCROLL FOR NEXT