मुंबई

इक्बाल मिर्चीच्या कुटुंबियांना फरारी घोषित करा, ईडीचा न्यायालयात अर्ज

अनिश पाटील

मुंबई: दाऊदचा विश्वासू इक्बाल मिर्चीच्या कुटुंबियांशी संबंधित सुमारे 800 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने(ईडी) टाच आणल्यानंतर आता मिर्चीच्या कुटुंबियांना फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यासाठी ईडीने न्यायालयात धाव घेतली आहे. ईडीने याबाबत नुकताच न्यायालयाला अर्ज केला आहे.

मिर्चीची पत्नी हाजरा मेमन, दोन मुलं आसीफ आणि जुनैद यांच्यासह 13 जणांवर ईडीने डिसेंबर 2019 मध्ये गुन्हा दाखल केला होता. मिर्चीने बेकायदेशीररित्या मिळवलेल्या मालमत्तेतून भारतात मालमत्ता खरेदी केली. त्यानंतर ही मालमत्ता पुनर्विकासासाठी विकण्यात आल्याचा आरोप आहे. त्यात मिर्चीने बेकायदा खरेदी केलेल्या मालमत्तेचा लाभ त्याच्या कुटुंबियांनी घेतल्याचा आरोप आहे. ते या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी याप्रकरणी अनेकवेळा मिर्चीच्या कुटुंबियांना समन्स पाठवले होते. पण त्यानंतर ते हजर न झाल्यामुळे अखेर ईडीने मार्च महिन्यात मिर्ची कुटुंबियांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यासाठी विशेष न्यायालयात धाव घेतली होती. नुकतीच ईडीची ती मागणी न्यायालयाने मान्य केली होती. त्यापुढे जाऊन आता ईडीने त्यांना फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. फरार आर्थिक गुन्हेगार कायदा 2018 अंतर्गत ही मागणी करण्यात आल्याचे अधिका-याने सांगितले.

भारतातील गुन्हेगारीतून कमवलेल्या पैशांतून इक्‍बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावावर लंडनमध्ये 25 मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील 16 मालमत्ता हाजरा मेमन हिच्या नावावर आहेत. याशिवाय युकेमध्ये चार कंपन्यांच्या नावावर सहा मालमत्ता आहेत. याशिवाय यूएईतील मिहाय इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लि. या कंपनीच्या नावावरही लंडनमेध्य तीन मालमत्ता आहेत. याशिवाय एकट्या मुंबईत मिर्चीची बेनामी 500 कोटींची मालमत्ता आहे.

साफेमा या केंद्रीय यंत्रणेद्वारे  मिर्चीच्या मुंबईतील दोन फ्लॅटचा लिलावही 10 नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी सफेममार्फत या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला होता.  पण ही मालमत्ता खरेदी करण्याठी त्यावेळी कोणीही उत्सुकता दाखवली नाही. सफेमाने या मालमत्तेची बेस किंमत तीन कोटी 45 लाख रुपये निश्‍चित केली होती. ही बेस किंमत अधिक वाटल्यामुळे कोणीही मालमत्ता खरेदी करण्यासाठी बोली लावली नाही. सांताक्रुझ येथील उच्चभ्रू जुहू तारा रोडवर ही मालमत्ता आहे. तेथील मिल्टन सोसायटीमध्ये 501 आणि 502 हे दोन फ्लॅट आहेत. त्यांचे क्षेत्रफळ 1200 चौ.फूट आहे.

कोण होता  इक्बाल मिर्ची?

दाऊदचा विश्‍वासू असलेल्या मिर्चीला 1994 मध्ये तडीपार केले होते. दाऊद टोळीचा अंमली पदार्थांचा व्यवसाय तो सांभाळत असे. त्याला पकडण्यासाठी इंटरपोलने देखील नोटीस जारी केली होती. 1995 साली तो भारतातून विदेशात पळून गेला. 1988 पासून अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी तो मुंबई पोलिसांना हवा आहे. भायखळा येथे मिर्चीच्या कुटुंबियांचा मिरची विकण्याचा व्यवसाय होता. त्यामुळेच त्याला गुन्हेगारी जगतात मिर्ची हे टोपणनाव मिळाले. अंमली पदार्थांच्या प्रामुख्याने मॅण्ड्रेक्‍स गोळ्यांच्या तस्करीत तो कुप्रसिद्ध आहे. भारतातून परागंदा झाल्यानंतर मिर्चीने दुबईत आपले साम्राज्य निर्माण केले. 14 ऑगस्ट, 2013 मध्ये मिर्चीचा लंडनमध्ये हृदयविकाराच्या झटक्‍यामुळे मृत्यू झाला होता.

-------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Iqbal Mirchi family Declare financial criminal ED application court

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिल्याच सामन्यात शतक, आता विराट कोहली, रोहित शर्मा यांचा Vijay Hazare Trophy मधील पुढील सामना कधी? वाचा सर्व डिटेल्स

Shukra Gochar 2026: वर्षाच्या पहिल्याच गोचरमध्ये ‘या’ राशींचं नशीब फुलणार, करिअरला मिळणार मोठी उंची

प्रसिद्ध मराठी अभिनेता अडकला लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल, पत्नी आहे तरी कोण?

Panchang 25 December 2025: आजच्या दिवशी हळद, बेलफळ चूर्ण किंवा आवळकाठी चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे

Kolhapur Election : माजी नगरसेवकांनी शड्डू ठोकल्याने चुरस; मतांची गोळाबेरीज करण्याचे आव्हान, मताधिक्य कोणाला याचीच उत्सुकता

SCROLL FOR NEXT