Aditya Thackeray s brother Tejas Thackeray is researching on the lizard species 
मुंबई

तेजसच्या रूपाने तिसऱ्या ठाकरेंचा राजकारणात प्रवेश होणार ?

शुभेच्छा देताना तेजस यांना ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस् म्हटले आहे.

सकाळ वृत्तसेवा

- रश्मी पुराणिक

मुंबई: शिवसेनेमध्ये आदित्य ठाकरे (Aditya thackeray) यांचे नेतृत्व आता बऱ्यापैकी स्थापित झाले असून २०२२ ची मुंबई महापालिका निवडणूक (bmc election) त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचे लहान बंधु तेजस ठाकरेही (Tejas thackeray) राजकारणात सक्रीय (Active politics) होणार असल्याची जोरदार चर्चा पाहायला मिळतेय.

आज तेजस ठाकरे यांचा जन्मदिवस असून त्यांना वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सामनाच्या पहिल्या पानावर तेजस ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी जाहीरात प्रसिद्ध झाली आहे. उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी ही जाहीरात दिली आहे. मिलिंद नार्वेकरांनी त्यांना शुभेच्छा देताना ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस् म्हटले आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तेजस यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. त्यामुळे आता आदित्य नंतर तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आदित्य ठाकरे आज राजकारणात पूर्णपणे सक्रीय आहेत. तेजस ठाकरे त्यामनाने राजकारणात तितके सक्रीय दिसत नाहीत.

राजकारणापासून कायम अलिप्त राहणारा तेजस उद्धव ठाकरे यांच्याबद्दल लोकांमध्ये आणि विशेषता शिवसैनिकांमध्ये कायम कुतूहल राहिलय. तेजस ठाकरे हे सहसा राजकीय व्यासपीठावर आपण याआधी कधी पाहिले नव्हते. पण २०१९ च्या निवडणुकांमध्ये काही सभांमध्ये आणि विशेषतः मोठ्या बंधूनच्या म्हणजेच आदित्य ठाकरे यांच्या प्रचार सभेत वरळीत अनेकदा प्रचार फेऱ्यांमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यावेळी या विषयी उद्धव ठाकरे यांनी "तेजस हा जंगलात रमणारा माणूस आहे. तो इकडे माणसांच्या जंगलात रमणार नाही. सभा कशी असते, ते पाहण्यासाठी तो आला आहे.” असं म्हटलं होतं . तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १७ ऑक्टोबर २०१० रोजी आदित्य ठाकरे यांचा राजकीय प्रवेश करून घेत युवा सेनेची धुरा आदित्य यांच्या हाती देत असताना “तेजसची तोडफोड सेना आहे, त्याची स्टाईल माझ्यासारखी आहे, छंद माझ्याशी जुळते आहेत, वन्यजीवन त्याला आवडतं ,” असं म्हणत तेजसचं कौतुक केलं होतं . त्यामुळे तेजस हे राजकारणात येतील की नाही याविषयी कायम चर्चा होत राहिल्यात आणि आज त्याचीच पुनरावृत्ती होतेय.

तेजस उद्धव ठाकरे हे राजकारणापासून दूर असले तरी त्यांनी त्यांचा एक वेगळा छंद जोपासलाय. तेजस एक वन्यजीव संशोधक आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर वन्यजीव संशोधन करणाऱ्या अनेक संस्थांशी ते जोडले गेलेले आहेत. आजवर माश्यांच्या, खेकड्यांच्या आणि काही वन्य जीवांचा त्यांनी नव्याने शोध लावलाय आणि त्या वन्यजीवांना नावंही दिलीयत. विशेषतः खेकड्यांच्या प्रजातींमध्ये गॅटीएना पत्रोपर्पर्रीया , गॅटीएना स्पेंडीटा , गुबरमॅतोरिएना एग्लोकी , गुबरमॅतोरिएना वॅगी आणि भगव्या रंगाचा गुबरमॅतोरिएना थॅकरी अश्या नावाच्या या प्रजातींचा समावेश आहे. यातील गुबरमॅतोरिएना थॅकरी या प्रजातीला ठाकरे आडनाव दिलं गेलंय . तेजस यांनी शोधलेल्या खेकड्यांच्या नव्या प्रजातीला 'झुटास्का' नावाच्या वन्यजीवांवर निघणाऱ्या सप्ताहिकेने ही नावं दिली होती. याव्यतिरिक्त सह्याद्री पर्वतरांगेत त्यांनी केलेल्या वन्यजीवांच्या संशोधनात एका माश्याचा शोधलावला होता, त्या माश्यालाही 'हिरण्यकेशी' असं नाव देण्यात आलं होतं. आजवर तेजस यांनी १४ वन्य जीवांचा शोध लावून त्यावर शोध निबंध तयार केलेत, यातील काही शोध निबंध आंतरराष्ट्री मासिक आणि काही नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे वन्यजीव संशोधन करणाऱ्या तेजस या लहानपणापासून राजकारणाच बाळकडू मिळूनही त्यांनी वेगळा मार्ग चोखाळलाय.

पण इतिसात डोकावून पाहिलं तर सध्या राज्यात यशस्वीपणे महाविकास आघाडीचं नेतृत्व करत मुख्यमंत्रीपदाची धुरा यशस्वी सांभाळणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः एक फोटोग्राफर होते, आणि ते कायम राजकारणापासून दूर राहत होते. त्यांचा राजकारणातली प्रवेश आणि नंतर राजकीय यशस्वी वाटचाल करत मुख्यमंत्री पद सांभाळत महाविकास आघाडीची धुरा सांभाळणारे उद्धव ठाकरे आपण पाहतोय . तेजस ठाकरे त्याच कुटुंबातील सदस्य असताना ते राजकारणापासून अलिप्त राहतील असं कसं होईल ?

आदित्य ठाकरे यांनी युवासेनेची जबाबदारी संभाळतानाच त्यांच्याकडे आता मंत्रिपद आहे, महापालिकेच्या निवडणुकांची जबाबदारीही आदित्यच सांभाळत आहेत. त्यामुळे युवासेनेची जबाबदारी ठाकरे कुटुंबतीलच तिसऱ्या पिढीतील धाकट्या ठाकरेकडेच सोपवली जाईल अशी चर्चा सुरू आहे आणि राजकारणापासून कायम अलिप्त राहिलेले तेजस हे बाळासाहेबांप्रमाणे आक्रमक आहेत, पण त्यांचा स्वभाव हा आक्रमक असूनही तितकाच संयमी आहे, त्यामुळे भविष्यात राजकारणात येऊन युवा सेनेची धुरा ते सांभाळतील अशी शक्यता आता वाढलीय. आणि आजच्या सेनेच्या नेत्यांनी दिलेल्या जाहीर शुभेच्छा त्याचीच नांदी आहे असं म्हंटल्यास वावग ठरणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Badrinath Kedarnath Entry Ban : बद्रीनाथ,केदारनाथ सह 'या' ४८ मंदिरांतही गैर हिंदूना प्रवेश बंदीची तयारी, कशामुळे घेतला निर्णय ?

Astrology Money : 1 फेब्रुवारी! माघ पौर्णिमेला सर्वार्थ सिद्धि योगसह अनेक शुभ योग; 2026 मध्ये धनलाभ हवा असेल तर नक्की करा 'हे' एक काम

Beed News : पोलिसच विनाहेल्मेट! सक्ती केवळ पहिल्या दिवशीच; रस्ता सुरक्षा अभियानाचा अधिकाऱ्यांना पडला विसर

Latest Marathi news Update : मुंबई - नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

March Astrology 2026: 30 वर्षांनी मोठा ग्रहयोग! मार्चमध्ये शनि–सूर्य एकत्र, ‘या’ 3 राशींना होणार जबरदस्त आर्थिक फायदा

SCROLL FOR NEXT