ins mumbai 
मुंबई

आता मुंबईच्या समुद्रातही आयसोलेशन सेंटर

अनिश पाटील

मुंबई ः राज्यासह मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढ होत चालली आरोग्य यंत्रणेच्या मदतीला आता नौदलही धावून आले आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी नौदलाची `आयएनएस मुंबई` ही विनाशिका सज्ज करण्यात आली आहे. या विनाशिकेवर आयसोलेशन सेंटर म्हणजेच विलगीकरण कक्ष उभारण्यात येणार आहे. त्याबाबतचे आदेश संरक्षण मंत्रालयाने पश्चिम नौदलाला दिले आहेत.

मुंबईसह राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही अडीज हजारांच्या घरात पोहचली आहे. तर शंभरहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत देशभर लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र, कोरोनाच्या रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता मंगळवारी पुन्हा पंतप्रधान मोदी यांनी 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवत असल्याचे जाहीर केले. यादरम्यान, कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. 

त्याशिवाय लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. मुंबईत सध्या सात हॉटस्पॉट असून या ठिकाणी कोरोना बाधितांची संख्या दिवसे-दिवस वाढत चालली आहे. त्यासाठी यापूर्वीच अनेक शाळा, रेल्वेच्या बोगी, सभागृहांसह खासगी रुग्णालयांचे आयसोलेशनमध्ये रुपांतर करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबईत कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालल्याने मुंबईत असलेल्या पश्चिम नौदलाने घाटकोपर येथे एक आयसोलेशन सेंटर तयार केले होते. यातील अनेक रुग्ण नौदलाच्या सतर्कता आणि सुरक्षेमुळे व्यवस्थित होऊन घरी परतल्याचा अहवाल पश्चिम नौदलाने नौदल मुख्यालयाकडे पाठविला होता. नौदलाने त्याची दखल घेत तो अहवाल संरक्षण मंत्रालयाकडे पाठवून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढल्या कोमकोणत्या उपाययोजना करता येइल का ? यावर विचारमंथन सुरु होते.

या पार्श्वभूमीवर आयएनएस मुंबई ही दिल्ली वर्गातील विनाशिका आयसोलेशन सेंटरसाठी सज्ज करण्याचे आदेश संरक्षण मंत्रालयाने (एमओडी) नौदल मुख्यालयाला दिले. तर नौदल मुख्यालयाने तत्काळ याची माहिती पश्चिम नौदल प्रमुखांना दिली आहे. त्यानुसार, आयएनएस मुंबई या विनाशिकेवर आयसोलेशन सेंटर उभे करण्याची नौदलाने तयारी सुरु केली आहे. आयएनएस मुंबई ही कुलाबा येथील नौदल डॉकयार्डात उभी असून याची संपूर्ण तयारीची जबाबदारी आयएनएस मुंबईच्या कॅप्टन आणि जवानावर सोपविण्यात आल्याचे नौदल अधिकाऱ्याने सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Marathi News Live Updates : माळशेज घाटात एसटी बस बंद पडल्याने वाहतूक कोंडी

घरी नणंदेसोबत कशी वागते करीना कपूर? सैफ अली खानच्या बहिणीने सांगितली आतली गोष्ट; म्हणाली- ती नाटकी...

Numerology Success After 35 : 'या' मूलांकाच्या लोकांना उशिरा मिळते यश; आधी करावा लागतो संघर्ष, पण वयाच्या पस्तीशी-चाळीशीनंतर बदलते नशीब

Aditya Thackeray: राज्यातील उद्योगांची स्थिती बिकट, ३५ हजार उद्योग बंद, रोजगारावर गंभीर परिणाम; आदित्य ठाकरेंचे आरोप

SCROLL FOR NEXT