मुंबई

आयटीआयची प्रवेश प्रवेशप्रक्रिया 1 ऑगस्टपासून; यंदा तब्बल 'इतक्या' जागा उपलब्ध.... 

तेजस वाघमारे

मुंबई : दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता पुढील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया सुरु झाल्या आहे. आयटीआय प्रवेशाची प्रक्रीया केंद्रीयभूत ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येणार आहे. या प्रवेश प्रकियेचे अर्ज https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर 1 ऑगस्टपासून  उपलब्ध होणार आहेत. खाजगी आणि सरकारी अशा 986 आयटीआयमध्ये 1 लाख 45 हजार 828 जागा उपलब्ध आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयटीआय कधी सुरु होतील, याबाबत सरकारच्या निर्णयायानुसार माहिती जाहीर करण्यात करण्यात येणार आहे.

आयटीआय प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अशी किमान शैक्षणिक पात्रता आहे. किमान शैक्षणिक अर्हता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक अर्हता धारण करणारे 14 वर्षावरील उमेदवार आयटीआय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. प्रवेशासाठी उच्च वयोमर्यादा निर्धारित करण्यात आलेली नाही, जेणेकरुन वयाच्या कोणत्याही टप्प्यावर इच्छूक उमेदवार प्रवेश घेऊ शकतात. यंदा प्रवेश अर्ज व नोंदणी शुल्क भरणे, आयटीआय केंद्रांची निवड करणे, प्रवेश अर्जात सुधारणा, दुरुस्ती करणे, हरकती नोंदविणे आदी सर्व कामे विद्यार्थ्यांना ऑनलाईन करता येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेशासाठी गर्दी होऊ नये, विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागू नये याकरिता प्रवेश प्रक्रियेच्या सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत, असे मंत्री कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

राज्यात प्रत्येक तालुक्यात किमान एक शासकीय आयटीआय आहे. 358 तालुक्यात 417 शासकीय आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता 92 हजार 556 इतकी आहे. आदिवासी भागात आदिवासींसाठी 61 संस्था, अनुसूचित जाती व नवबौध्दांसाठी 4 उच्चस्तर संस्था, अल्पसंख्याकांसाठी 2 स्वतंत्र संस्था व 43 शासकीय आयटीआयमध्ये स्वतंत्र तुकड्या, महिलांसाठी 15 तर 28 आदिवासी (आश्रमशाळा) आयटीआय अशा संस्थांचा समावेश आहे.  असे राज्यात 569 खाजगी आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता 53 हजार 272 आहे. शासकीय आणि खाजगी 986 आयटीआय असून त्यांची एकूण प्रवेशक्षमता 1 लाख 45 हजार 828 विद्यार्थी इतकी आहे.


महत्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज करणे : 1 ते 14 ऑगस्ट 2020
  • पहिल्या फेरीसाठी प्राधान्य : 2 ते 14 ऑगस्ट
  • प्राथमिक गुणवत्ता यादी : 16 ऑगस्ट सकाळी 11 वाजता
  • हरकत / बदल नोंदणी : 16 आणि 17 ऑगस्ट
  • अंतिम गुणवत्ता यादी : 18 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता
  • पहिली प्रवेश फेरी : 20 ऑगस्ट
  • दुसरी प्रवेश फेरी : 30 ऑगस्ट
  • तिसरी प्रवेश फेरी : 7 सप्टेंबर 
  • चौथी प्रवेश फेरी : 15 सप्टेंबर
  • नवीन प्रवेश : 1 ते 19 सप्टेंबर
    ----
    संपादन ः ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Politics: थलापती विजय यांना मोठा धक्का! फ्लोअर टेस्टमध्ये साथ देणाऱ्या आमदारांनी पलटी मारली; तमिळनाडूच्या राजकारणात यू-टर्न

IPL 2026 Qualifier 1 : गुजरात टायटन्सची पराभवामुळ डोकेदुखी वाढली! शुभमन गिल अन् संघाची झोप उडवणारी बातमी...

Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! तामिळनाडू सरकारने जाहीर केली पीक कर्जमाफी; 14 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना थेट फायदा, 'थलपती'नं दिलेलं आश्वासन पाळलं

Bike Mileage Increasing Tips : टू व्हीलर गाडीचं मायलेज कमी आहे? मग आजच करा 'हे' 5 बदल, मायलेज होईल डबल

Latest Marathi News Live Update : ईदनिमित्त बळी देण्याची परवानगी रद्द, वरिष्ठ पोलिसांची माहिती

SCROLL FOR NEXT