Bhondubaba arrested
Bhondubaba arrested sakal media
मुंबई

डोंबिवली: १२ वी पास पवनचा भरायचा दरबार, अंगात सप्तश्रृंगी येत असल्याचा दावा

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कुटुंबावर करनी झाल्याचे सांगत दोन महिलांना तब्बल 32 लाखाला जळगावच्या भोंदूबाबाने गंडा (Money fraud) घातल्याची घटना डोंबिवलीत (Dombivali) शुक्रवारी उघडकीस आली होती. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, भोंदूबाबा पवन पाटील याला पोलिसांनी डोंबिवलीतून अटक (culprit arrested) केली. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने भोंदूबाबास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पवन हा जळगावला (Jalgaon) दरबार भरवत असल्याची माहिती समोर आली आहे. पवन हा डोंबिवलीत कधी आला ? त्याला डोंबिवलीत कोठून अटक करण्यात आली ? हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. (Jalgaon bhondu baba pawan patil arrested in superstition crime)

डोंबिवली पूर्वेतील आयरे रोड परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाची जळगाव येथील पवन पाटील (वय 28) याने 32 लाखाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. कळवा येथे राहणाऱ्या प्रियंका राणे यांचे कुटुंब डोंबिवली तील आयरे रोड परिसरात रहाते. प्रियंका यांचे वडील आजारी असून त्यांना बरे करण्यासाठी तसेच कुटूंबावर करनी झाल्याचे सांगत पाटील याने त्यांच्याकडून पैसे आणि सोन्याचे दागिने असे एकूण 32 लाख रुपये उकळले आहेत.

डिसेंबर 2019 पासून पवन या कुटुंबाची फसवेगिरी करत होता. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रियंका हिने शुक्रवारी रामनगर पोलीस ठाणे गाठत पवन याच्या विरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच शुक्रवारीच पोलिसांनी पवन याला डोंबिवलीतून अटक केली. पवन डोंबिवलीत कधी आला होता, तो पीडित कुटूंबास भेटण्यास आला होता का? पोलिसांच्या तावडीत तो कसा सापडला ? हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. याविषयी पोलिसांना विचारले असता केवळ डोंबिवली तून त्यास अटक करण्यात आली एवढेच बोलून पोलिसांनी अधिक माहिती देण्याचे टाळले.

जळगावला पवन भरवतो दरबार

पवन हा जळगावला दरबार भरवत असून आपल्या अंगात सप्तश्रृंगी माता येत असल्याचे सांगत तो नागरिकांची दिशाभूल करत असे. हातातून खडीसाखर, कुंकू काढून दाखवणे, चांदीची देवीची मूर्ती काढून दाखवत असे. तसेच त्याचे म्हणणे ऐकले नाही तर देवीचा कोप होईल अशी भीती तो नागरिकांना घालत होता.

- पवन याचे 12 वी शिक्षण झाले असून झटपट पैसे कमवण्यासाठी तो हे काम करीत होता.

- जळगावला तो दरबार भरवत असून यातून त्याने अनेक नागरिकांची फसवणूक केली असल्याची शक्यता आहे. त्याचा उलगडा करण्यासाठी रामनगर पोलीस ठाण्याचे पथक जळगाव येथे लवकरच रवाना होणार आहे.

- जळगाव तसेच अनेक ठिकाणच्या नागरिकांची पवन याने फसवणूक केली असल्याची शक्यता आहे. फसवणूक झालेल्या नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन रामनगर पोलिसांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT