Vikhe Patil’s Reply to Jarange’s Demands :मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी उभारलेल्या लढ्याला अखेर यश आलं आहे. पाच दिवस मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेलं उपोषण जरांगेंनी अखेर सरकारकडून मागण्या मान्य झाल्यानंतर सोडलं आहे. यामध्ये मंत्रिमंडळ उपसमितीने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. या समितीचे अध्यक्ष विखे पाटील यांनी हे उपोषण सोडवण्यासाठी जरांगेंशी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी जाऊन संवाद साधला. यावेळी जरांगेंनी त्यांना काही प्रश्न विचारले ज्यावर विखेंनी उत्तरेही दिली, जी देखील महत्त्वाची ठरली आहेत.
याचपार्श्वूमीवर उपोषण सोडण्यासाठी मनोज जरांगे यांनी मंत्री विखेंना विचारलेली प्रश्न आणि त्यावर विखेंचे उत्तर नेमकं काय होतं, हे आपण पाहूयात -
जरांगे - हैदराबादचे गॅझेटियर आमच्यावर लागू झालं, हे तुम्हाला मान्य आहे का? आमच्या हैदराबादच्या गॅझेटियरची अंमलबजवाणी झाली का?
विखे – आपण अंमलबजावणीसाठीच अध्यादेश(जीआर) काढला आहे.
जरांगे – गॅझेटियरमधील नोंदींच्या आधारे आम्हाला कुणबी प्रमाणपत्र आता दिले जाणार का?
विखे – बरोबर आहे. आपण दिलेल्या निकषांची पूर्तता केली की, प्रमाणपत्र दिले जाईल.
जरांगे – मराठवाड्यातील मराठे हेच कुणबी आहेत, या अध्यादेशाच्या माध्यमातून याच पद्धतीने गॅझेटियर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, नायबतहसीलदार, मुख्य प्राधीकरण यावर जो काम कऱणार आहे २०१२चा कायदा जो ओबीसी कायद्याला अधिकृत करतो, या कायद्यानुसार तुमची त्रिसदस्यीय समिती यांच्याकडेही हे गॅझेटियर द्यावं लागणार आहे.
याशिवाय जरांगे विखेंना असंही म्हणाले की, मला जर उद्या-परवा अभ्यासक येवून म्हणाले की पाटील आपली फसवणूक झाली, तर अशावेळी मला आपल्याकडून एकच शब्द हवा आहे की, त्यावर सुधारित एक जीआर काढला जावा.
विखे – मी जरांगे पाटलांना एवढंच सांगू इच्छितो की, अतिशय विचारपूर्वक आपण या सर्व प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत. अध्यादेशाच्या माध्यमातून, तरीही त्यात जर एखादी शंका उपस्थित झाली तर निश्चितचपणे ते माझ्याकडे पाठवा, मी त्याचे समाधान करेन. त्यांना जर वाटलं शुद्धीपत्रक काढायचं तर आपण तसंही करूया.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.