मुंबई

जेईर्ई दोन परिक्षार्थीत किमान एवढ्या फूटांचे अंतर आवश्यक

संजय घारपुरे

मुंबई ः जेईई आणि नीटची परिक्षा लांबणीवर टाकण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर या परिक्षेची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार दोन परिक्षार्थीमध्ये किमान सहा फूटांचे अंतर आवश्यक आहे.

परिक्षामुळे कोरोनाची साथ पसरु नये यासाठी कठोर उपाय करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना परिक्षा सभागृहात हात स्वच्छ तसेच निर्जंतुक केल्यावरच प्रवेश देण्यात येणार आहे. त्याचबरोबर परिक्षेचे प्रत्येक सत्र सुरु होण्यापूर्वी तसेच संपल्यानंतर विद्यार्थ्यांची जागा पूर्ण निर्जंतुक करण्यात येईल. त्यात वर्क स्टेशन, किबोर्ड, बसण्याची जागा याचाही अंतर्भाव आहे. हात निर्जंतुक करण्यासाठी सॅनिटायझर परिक्षा केंद्रात तसेच परिक्षा होणाऱ्या हॉलमध्ये उपलब्ध असणे बंधनकारक आहे. 

हे वाचा : ...तर सीबीआय अधिका-यांना क्वारंटाईन व्हावे लागेल

आत्तापर्यंत परिक्षेच्यावेळी अॅडमिट कार्डद्वारे तपासणी होत असे. त्याऐवजी प्रत्येक केंद्रावर बारकोड रिडर उपलब्ध असेल. मास्क परिधान केला असल्यासच विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर प्रवेश असेल, त्याचबरोबर त्यांना सॅनिटायझरही घेऊन यावे लागेल. मात्र परिक्षा केंद्रावर देण्यात येणारा मास्कच त्यांना परिधान करावा लागेल.
प्रत्येक परिक्षार्थीस थ्री प्लाय मास्क परिक्षा केंद्रावर प्रवेश करताना देण्यात येईल. तोच त्यांनी परिक्षेच्या घालणे बंधनकारक आहे. मास्कचा कोणीही दुरुपयोग करु नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. परिक्षार्थींना केंद्रावर रफ शीटही देण्यात येणार आहे. प्रत्येक परिक्षार्थीस केंद्रावर प्रवेश देण्यात येईल, मात्र त्यांनी सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बुलेट छब्या गेला! बैलगाडा शर्यतीतील हिंदकेसरीची एक्झिट; अंत्यसंस्काराला हजारोंचा जनसागर, थार अन् लाखोंची बक्षिसे जिंकली...

कोण होती 'मोगली गर्ल'? २०१७ ला वयाच्या ८ व्या वर्षी सापडली जंगलात, १८ वर्षी निधन

Porsche Car Accident Case : अगरवालचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांची न्यायालयात धाव

Pune News : डॉ. प्रदीप कुरुलकर विरुद्ध दोषारोप निश्चित; जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुनावणीला सुरुवात

''मी पक्षप्रमुख पदाचा राजीनामा द्यायला तयार, पण... ''; उद्धव ठाकरेंनी घातली मोठी अट, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT