covid hospital 
मुंबई

डोंबिवलीत कोरोना रुग्णांची परवड थांबणार; जोंधळे विद्यालयात 'इतक्या' खाटांची सुविधा...

मयुरी चव्हाण-काकडे

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असून रुग्णांवर उपचारासाठी खाटा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. तसेच प्राथमिक लक्षण आणि संशयित व्यक्तींना क्वारंटाईन होण्यासाठी लांब जावे लागत असल्याने आता वॉर्डनिहाय क्वारंटाईन सेंटरसाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या आहे. 

कोरोनाविरुद्धच्या लढाईत शहरातील विविध क्षेत्रातील व्यक्ती पुढे येत असून डोंबिवलीतील जोंधळे विद्यालयाची वास्तूही केडीएमसीकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे. समर्थ समाज, जोंधळे विद्यासमूहाच्या संचालकांनी स. है. जोंधळे विद्यालयाची वास्तू कोव्हिड रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिल्याने डोंबिवलीकरांना दिलासा मिळाला आहे. 

जोंधळे विद्यालयात 49 खोल्या आणि एक मोठ्या सभागृहात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी सुमारे 150 ते 200 खाटा उपलब्ध करण्यात येणार असून यामुळे रुग्णांची खाटाअभावी होणारी परवड रोखता येणे शक्य होणार आहे. डोंबिवलीत खासगी तसेच पालिकेचे दवाखाने रुग्णांनी भरले आहेत. तर प्रतिदिन कोरोना रुग्णसंख्याही वाढत असून नव्या रुग्णांना उपचारासाठी वणवण फिरावे लागत आहे. त्यामुळे सामाजिक भान राखत समर्थ विद्यासमूहाचे संचालक आणि विश्वस्त सागर जोंधळे, देवेंद्र जोंधळे, वैशाली जोंधळे आदींनी पुढाकार घेत विद्यालय कोव्हिड रुग्णांना देण्याचा निर्णय घेतला. 

लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम; ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट...​

विश्वस्तांकडून सहकार्याचा हात
एकीकडे अन्य काही ठिकाणी पालिका प्रशासन शाळा ताब्यात घेत असताना संबंधित शाळा प्रशासनांकडून विरोध होत असताना डोंबिवलीत मात्र शाळेच्या विश्वस्तांनीच स्वतःहुन सहकार्याचा हात पुढे केला आहे. पालिका प्रशासन आणि नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी विद्यालयाची वास्तू केडीएमसीला हस्तांतरीत करण्यात आली असल्याचे सागर जोंधळे यांनी सांगितले. 

------

संपादन ः ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT