इथं रुग्णालयंच बनलंय 'कोरोनाचा हॉटस्पॉट'; कर्मचाऱ्यांवरील अतिरिक्त ताणाचा परिणाम 
मुंबई

इथं रुग्णालयचं बनलंय 'कोरोनाचा हॉटस्पॉट'; कर्मचाऱ्यांवरील अतिरिक्त ताणाचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा

कळवा  : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (कळवा रुग्णालय) मागील काही दिवसांपासून रुग्णालयातील कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका यांच्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे दिसून येत आहे. सध्यस्थितीला रुग्णालयात 29 डॉक्टर व 43 परिचरिकांना कोरोनाची लागण झाली असून क्षयरोग विभागातील एका डॉक्टरचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू देखील झाला आहे.


कळवा मुंब्रा परिसरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी व दाटीवटीच्या वस्त्या असून याठिकाणचे अंतिम टप्प्यातील अनेक रुग्ण कळवा रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे त्यांच्या बरोबर रुग्णालयातील कर्मचारी व परिचरिकाना कोरोनाची लागण होत आहे. त्यातच ठाण्यातील सामान्य रुग्णालयाचा संपूर्ण भार सध्या कळवा रुग्णालयाला सोसावा लागत असल्याने परिचरिकांवर कामाचा ताण सध्या प्रचंड प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे त्यांना सध्या डबल ड्युटी करावी लागत असून सुट्ट्या देखील मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे रुग्णालयातील अनेक कर्मचारी आजारी पडत असून त्यांना कोरोनाची लागण देखील होत आहे. वाढत्या बाधित कर्मचाऱ्यांमुळे सध्या कळवा रुग्णालय 'कोरोना  हॉटस्पॉट' ठरत आहे. दरम्यान कामाचा भार कमी होण्याकरीता रुग्णालयात नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्याची मागणी येथील कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका  व कर्मचारी यांचा कामाचा वाढता ताण लक्षात घेता प्रशासनाकडे कर्मचाऱ्यांची नवी भरती करण्या संदर्भात प्रस्ताव पाठवला आहे, त्याची दखल घेतली जाईल अशी अपेक्षा आहे.

– डॉ. प्रतिभा सावंत,  अधिष्ठाता, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

सुरू होऊन ८ महिने नाही झाले तोच निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका? मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चेला उधाण

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

Tata Sons Boardroom: बोर्डरूममध्ये टाटा सन्सचे ‘बंड’; सूत्रे पुन्हा चंद्रशेखरन यांच्याकडे, नोएल टाटांची नाराजी कायम

Agriculture Corruption: कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचाराचे उदंड ‘पीक’; राज्यात १६५ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT