kalyan lok sabha election Former MLA Subhash Bhoir and BJP MLA Ganpat Gaikwad met politics sakal
मुंबई

Lok Sabha Election : आजी माजी आमदारांची बंद दाराआड चर्चा ? या भेटीने कल्याण लोकसभा मतदार संघात चर्चांना उधाण!

माजी आमदार भोईर हे लोकसभेची तयारी करत आहेत का ? भविष्यात भोईर हे भाजपची वाट धरणार का ?

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण लोकसभा मतदार संघात राजकीय उलथापालथ सुरू आहे. त्यातच या मतदार संघातील शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर व भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड या आजी माजी आमदारांनी बंद दरवाजा आड एकमेकांची भेट घेतली आहे.

योग्य वेळी आम्ही योग्य चर्चा करू असे सूतोवाच दरम्यान आमदारांनी दिल्याने उपस्थित साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष सक्रिय झाले असताना ठाकरे गट आणि भाजप पक्ष यांच्या आमदारांच्या या भेटीने भविष्यात कल्याण लोकसभा मतदारसंघातील सत्तेची गणिते बदललेली पहायला मिळतील का ? या चर्चांना उधाण आले आहे.

राज्यात मित्रपक्षात धुसफूस सुरू असून ठाणे जिल्ह्यातील मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदार संघाची जोरदार चर्चा आहे. शिंदे गटाच्या या हक्काच्या जागेवर भाजप देखील दावा करत शिंदे यांना आव्हान देऊ केले आहे.

भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बॅनरवर भावी खासदार असा भोईर यांचा उल्लेख करत त्यांना शुभेच्छा देऊ केल्या. याचबरोबर राष्ट्रवादीचे माजी आमदार आनंद परांजपे हे देखील पुन्हा सक्रिय झाले असून त्यांच्या ही नावाची चर्चा इच्छुक उमेदवारांत केली जात आहे.

स्थानिक पातळीवर भाजप आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू असून यामध्ये मनसे आणि ठाकरे गटाची साथ मिळवण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. या सर्व घडामोडी सुरू असतानाच गुरुवारी कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण ग्रामीण चे आमदार सुभाष भोईर यांनी गायकवाड यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना शुभेच्छा देत भेट घेतली.

यावेळी बंद दाराआड त्यांच्यात चर्चा देखील झाल्याने त्यांच्या या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आमदार गायकवाड म्हणाले, आमचे घरचे संबंध आहेत. ते मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आले होते. असे असेल तरी बंद दाराआड या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली असावी? याची चर्चा आता रंगू लागली आहे.

माजी आमदार भोईर हे लोकसभेची तयारी करत आहेत का ? भविष्यात भोईर हे भाजपची वाट धरणार का ? याची पुन्हा एकदा या भेटीने चर्चा होत आहे. शिंदे भाजप गटातील वाद क्षमला नाही तर भाजप छुप्या पध्दतीने ठाकरे गटाला देखील मदत करू शकतात अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे. यामुळे भविष्यात कल्याण लोकसभा मतदारसंघातील सत्तेची गणिते बदललेली दिसली तर आश्चर्य वाटायला नको.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT