Kalyan Loksabha: sakal
मुंबई

Kalyan Loksabha: वैशाली दरेकर यांना पक्षाकडून एबी फॉर्म; मंगळवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज

येत्या मंगळवारी 30 एप्रिलला दरेकर या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत|Darekar is going to file his candidature on Tuesday, April 30

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Kalyan Loksabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा फॉर्म देण्यात आला असून येत्या मंगळवारी 30 एप्रिलला दरेकर या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना पक्षाकडून शुक्रवारी एबी फॉर्म देण्यात आला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कडून हा एबी फॉर्म देण्यात आला आहे. यावेळी मातोश्रीवर कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर परिसरातील जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. 30 एप्रिलला वैशाली दरेकर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. (Kalyan, Dombivli, Ulhasnagar)

कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने आपल्या उमेदवाराची घोषणा केली, तसेच त्यांना एबी फॉर्म देखील देण्यात आला आहे. तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांनी आपल्या प्रचारास देखील सुरवात केली आहे. मात्र पक्षाकडून अधिकृत घोषणा कधी होते याची सर्वच वाट पाहत आहेत.

महायुतीचे नेते आपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करण्यासाठी मैदानात उतरले आहेत.(Dr. Sealed in the name of Shrikant Shinde)

ठाणे, कल्याण, भिवंडी येथे देखील उमेदवारांचे अर्ज दाखल करताना महायुतीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून त्याची आखणी पक्षाकडून केली जात आहे. आता महाविकास आघाडी येत्या 30 तारखेला कशा प्रकारे शक्तिप्रदर्शन करते हे पहावे लागेल.(Thane, Kalyan, Bhiwandi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई गोवा हायवेवर महाकोंडी! ३ तासांच्या प्रवासाला १२ तास, एसटीतील प्रवाशांचा संताप

पावसाने रोखला गणेशभक्तांचा मार्ग! शनिवारच्या रात्रीत ६ हजार वाहनांचा प्रवास; रविवारी राहणार सर्वाधिक रहदारी

Sangli Ganpati: सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! बबलूनंतर आसाममधून येणार नवा हत्ती; गणपती संस्थानचा वैभवशाली थाट कायम राहणार

Marathi News Live Updates : पेपरफुटीला कायमचा आळा घालण्यासाठी झिरो लीक सिस्टीम; परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल, ऐनवेळी प्रश्नपत्रिका तयार करून ऑनलाइन वितरणाचा प्रस्ताव

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; पुढील दोन दिवसांत निर्णयाची शक्यता, ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

SCROLL FOR NEXT