shivsena kalyan loksabha  sakal
मुंबई

Kalyan loksabha: शिंदेंच टेंशन पुन्हा वाढणार? गणपत गायकवाडांच्या पत्नी ठाकरेंच्या उमेदवाराला म्हणाल्या विजयी भव

विरोधी पक्षाचे महायुतीचे संभाव्य उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्यावर त्यांनी पहिल्या दिवसापासून निशाणा साधण्यास सुरवात केली आहे | They have started targeting Srikant Shinde, the likely candidate of the opposition party's Grand Alliance, from day one.

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Dombivali News: महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी कल्याण मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत प्रचारास सुरूवात केली आहे.

विरोधी पक्षाचे महायुतीचे संभाव्य उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्यावर त्यांनी पहिल्या दिवसापासून निशाणा साधण्यास सुरवात केली आहे. अंबरनाथ येथे त्यांनी आपल्या भाषणात शिंदे यांची मिमिक्री करत त्यांना टोला लगावला आहे.

ज्यांना अ ब क येत नव्हतं, ते त्यांना शिवसेनेने शिकवलं असे म्हणत शिंदे यांच्या बोलण्याची मिमिक्री करत त्यांना डिवचले आहे.

अंबरनाथच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या कार्यालयात महाविकास आघाडीचे उमेदवार वैशाली दरेकर ह्या भेटीसाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी पदाधिकारी यांच्याशी विविध प्रश्नावर चर्चा केली. आपल्या भाषणांमध्ये दरेकर यांनी सांगितले की 2014 मध्ये ज्याला अ ब क बोलता येत नव्हतं ते त्यांना शिवसेनेने शिकवलं..

याबाबतचा प्रश्न ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना प्रसिद्धी माध्यमांनी विचारला असता, त्यांनी सांगितले की अ ब क काय म्हणजे माहिती आहे का? आपण जे काम करतोय, आपल्या कडील सध्याची परिस्थिती असेल किंवा समाजामध्ये जे काय चाललंय याचे विचार ज्याच्या मेंदूमध्ये क्लियर असतात, तो कधी "या ठिकाणी, त्या ठिकाणी" "मग असं करत नाही", असे नक्कल करुन दाखविले.

पुढे त्या म्हणाल्या, कारण त्याच्याकडे त्याच्या मेंदूमध्ये ते तयार असत. की आज मी अंबरनाथ मध्ये आले, अंबरनाथ मध्ये लोकांचे प्रश्न काय आहेत ? मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की, आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला तुम्ही इथे विचारलं ना की अंबरनाथ मधील प्रश्न काय? तर तो तुम्हाला झटपट सांगेल.

कारण तो रोज अंबरनाथ मध्ये रस्तो रस्ते फिरतोय. तो अनुभवतोय. जो अनुभवतो ना त्याच्या डोक्यामध्ये सगळे विषय क्लियर असतात. असं म्हणत वैशाली दरेकर यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करत मिमिक्री केली आह.

दरम्यान बुधवारी उपमुख्यमंत्री फडणवीस बदलापूरात आले होते, यावेळी त्यांनी महाविकास आघाडीला टोला लागवला. याला आता ठाकरे गटाच्या उमेदवार दरेकर यांनी उत्तर दिले आहॆ.

महायुतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव इंजिन आहे. त्याला आपण वेगवेगळे डबे जोडले असून ही गाडी विकासाच्या दिशेने धावत आहे. मात्र सध्या महाविकास आघाडीची अवस्था पाहता त्यांच्यात प्रत्येकाने स्वतःला इंजिन घोषित केले असून यांच्या प्रत्येक इंजिनाची दिशा वेगळी आहे. असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूर येथे महाविकास आघाडीला लगावला.

कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि कपिल पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी बदलापूरमध्ये आलेल्या फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.

यावरच ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर आपली प्रतिक्रिया देत सांगितले की, त्यांचा टीआरपी कसा वाढेल? ठीक आहे? आमची भरकटलेली गाडी असू दे. डबे नसलेली इंजिन असू द्या. तुम्ही नवीन नवीन इंजिन जॉईन करतात, त्यातून तुमचा कितपत धूर निघतो ते बघा, असा टोला दरेकर यांनी लागवला...

कल्याण मधील नववर्ष स्वागत यात्रेत भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड आणि ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर या सोबत दिसल्या होत्या. याबाबत दरेकर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की ती एक साधी, सरळ गृहिणी आहे. आज त्यांना यावं लागलं कारण त्यांचे पती गणपत गायकवाड इथे नाही आहेत.

परंतु मी जेव्हा त्यांना भेटली तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले. आणि त्या म्हणाल्या मी त्यांना मिस करते. पण ठीक आहे, तुम्ही उभ्या आहात उमेदवारी मिळाली आहे, माझे शुभ आशीर्वाद आहेत, विजय भव.. असे दरेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT