मुंबई

राष्ट्रद्रोहाचा गुन्हा रद्द करावा आणि बजावलेल्या समन्सला स्थगिती द्यावी, कंगनाची मुंबई उच्च न्यायालयात धाव

- सुनीता महामुणकर

मुंबई, ता. 23 : मुंबई पोलिसांनी दाखल केलेला राष्ट्रद्रोहाचा गुन्हा रद्द करण्यासाठी अभिनेत्री कंगना रनौतने मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी याचिका दाखल केली. आतापर्यंत तीनवेळा तीला पोलिसांनी समन्स बजावले आहे.वांद्रे न्यायालयाने दिलेल्या निर्देशावरुन वांद्रे पोलिसांनी कंगना आणि तिची बहिण रंगोली चंडेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिस आणि राज्य सरकार विरोधात त्यांनी केलेल्या ट्विटस विरोधात वकिल मुनावरअली सय्यद यांनी कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात न्यायालयात तक्रार केली आहे.

या तक्रारीची दखल घेऊन न्यायालयाने तिच्या विरोधात एफआयआर नोंदविण्याचे आणि चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. आतापर्यंत तीनवेळा तीला मुंबई पोलिसांनी समन्स बजावले होते. मात्र दोघिंनीही चौकशीला हजेरी लावली नाही. 

आज ऍडव्होकेट रिझवान सिद्दीकी यांच्यामार्फत तीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करावा या मागणीबरोबरच पोलिसांनी बजावलेल्या समन्सला स्थगिती द्यावी आणि त्यांच्या विरोधात कोणतीही कठोर कारवाई करण्यास पोलिसांना मनाई करावी, अशी मागणी केली आहे.

कंगनाने आपल्या ट्विटमध्ये मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरबरोबर केली होती. यावरून तिच्या विरोधात अन्य तीन पोलिस तक्रारी दाखल झाल्या आहेत. तसेच न्यायालयाने आदेश दिल्यावर पोलिसांनी बजावलेल्या समन्सवरही तीने आक्षेपार्ह पध्दतीने ट्विट केले, अशी फिर्यादही करण्यात आली आहे. समाजात द्वेष आणि तेढ निर्माण करीत असल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे.

( संपादन - सुमित बागुल )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2026 First Look: मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन आज! लालबागच्या राजाचा LIVE सोहळा कुठे पाहाल?

Lakhani Bolero Accident : माहेरची वाट धरली अन् काळाने घाला घातला; तीजसाठी निघालेल्या ९ जणींचा अपघातात करुण अंत

Pune Fraud News : आजार बरा करण्‍याच्‍या बहाण्‍याने भोंदू महिलेने उकळले ४५ हजार; बिबवेवाडीतील भोंदू मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : लक्ष्मण हाकेंचा अभिजीत दिपकेंना टोला; म्हणाले, ‘आधी...

PF खात्यातून इमर्जन्सीत पैसे काढायचे आहेत? EPFO ने बदलले नियम, आता मिळतील 'इतके' टक्के पैसे!

SCROLL FOR NEXT