मुंबई

कंगनाला नुकसान भरपाई मिळावी; रामदास आठवलेंची राज्यपालांकडे मागणी 

मिलिंद तांबे

मुंबई :  मुंबई पालिकेने अभिनेत्री कंगना राणौततच्या कार्यालयावर 24 तासांची नोटीस देऊन तोडक कारवाई केली. पालिकेने नियमांचे उल्लंघन करून ही कारवाई केली आहे. त्यामुळे कंगनाला नुकसान भरपाई मिळायला हवी. तसेच, ज्या अधिकाऱ्यांनी हि कारवाई केली त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत त्यांच्याकडे केली.  

कोरोनाला रोखण्यास महाविकास आघाडी सरकारला अपयश आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोरोनाविरोधात कठोर पावले उचलावीत, असे आदेश भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारला  द्यावेत, असेही निवेदन आठवले यांनी दिले. दरम्यान, कंगना राणौतच्या समर्थनार्थ रामदास आठवले मैदानात उतरले असून त्यांनी कंगनाचीही भेट घेतली आहे. 

याशिवाय कॅप्टन दीपक साठे यांचा कोझिकोड येथे विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्यांनी जीवाची पर्वा न करता अनेक प्रवाशांचे प्राण वाचवले. त्यामुळे त्यांना मरणोत्तर महाराष्ट्र् भूषण पुरस्कार मिळावा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vajreshwari Kund : वज्रेश्वरीतील गरम पाण्याचे झरे धोक्यात! शंकर मंदिरासमोरील पवित्र कुंड पूर्णपणे कोरडे; भाविकांमध्ये तीव्र नाराजी, गेल्या 3 वर्षांपासून नेमकं काय घडतंय?

Gangapur farmers: गंगापूर तालुक्यात मान्सून रखडल्याने शेतकरी चिंताग्रस्त; मृग नक्षत्रात पावसाची प्रतीक्षा, 15 जूननंतर पेरणीचा सल्ला

Latest Marathi News Live Update : महाड मनसे आक्रमक, स्थानिकांना रोजगार, मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर अधिकाऱ्यांना धरले धारेवर

MPSC Success Story भावाने उचलली शिक्षणाची जबाबदारी; बहिणीची जिद्दीच्या जोरावर MPSC मध्ये भरारी, पूजा घोडके यांचा प्रेरणादायी प्रवास..

वर्ल्डकपआधीच फूटबॉलविश्व हादरलं! मुंबईत नामांकित प्रशिक्षकाकडून महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार; व्हिडिओ बनवून ३ वर्षे ब्लॅकमेल

SCROLL FOR NEXT