संग्रहित  
मुंबई

कर्नाळा बॅंकेवर आज मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कर्नाळा बॅंकेतील ठेवीदार, खातेदारांना आश्वासन देऊनसुद्धा पैसे मिळाले नाहीत. बॅंकेतील हक्काचे पैसे परत मिळावेत, यासाठी कर्नाळा बॅंक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून गुरुवारी (ता.13) सकाळी 10 वाजता पनवेल येथील कर्नाळा बॅंकेच्या मुख्य शाखेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये हजारो ठेवीदार सहभागी होणार आहे.

कर्नाळा बॅंकेत 513 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. बॅंकेचे अध्यक्ष व माजी आमदार विवेक पाटील हे ठेवीदारांना समाधानकारक उत्तरे देत नसल्याने हजारो कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. ठेवीदारांना न्याय मिळावा, यासाठी माजी खासदार किरीट सोमैया यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी कर्नाळा बॅंक ठेवीदार संघर्ष समिती कार्यरत केली आहे.

या समितीच्या माध्यमातून पनवेल येथील कर्नाळा बॅंकेच्या मुख्य शाखेवर गुरुवारी (ता.12) सकाळी 10 वाजता भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. पनवेल भाजप मध्यवर्ती कार्यालय येथून या मोर्चाला सुरुवात होणार असून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा, भाजी मार्केट, शनेश्वर मंदिर टपाल नाका असे मार्गक्रमण करून कर्नाळा नागरी सहकार बॅंकेवर हा मोर्चा धडकणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जय भीम चित्रपटाची पुनरावृत्ती? राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं; ठाणेदारासह 9 पोलिसांना जन्मठेप, काय आहे बेग्या पवार प्रकरण?

'लोक माझ्या पाया पडायला येतात' देवदत्त नागेने सांगितल्या प्रेक्षकांच्या भावना, म्हणाला... 'मी त्यांना जेजुरीच्या दिशेनं हात...'

Latest Marathi News Live Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील दोन-तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

Sus Gun Firing : शिवसेना जिल्हाप्रमुखाचा मध्यरात्री गोळीबार; जमिनीच्या वादातून सूसमधील प्रकार दोघांना अटक

Maharashtra Rain Alert : कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर; पुणे घाटमाथ्यासह अनेक जिल्ह्यांना रेड-ऑरेंज अलर्ट, कोयना धरणात आवक वाढली

SCROLL FOR NEXT