मुंबई

KDMC Breaking: कल्याण डोंबिवलीत प्रथमच; ठेकेदाराची मुदत संपली आणि जल तरण तलाव झाला बंद

मुदत कालावधी उलटला तरी अद्याप त्यांना मंजुरी न मिळाल्याने अखेर पालिका अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरूनच हा तलाव बंद करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे.

शर्मिला वाळुंज

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा संत सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलात तरण तलाव आहे. 1 डिसेंबर पासून अचानकपणे बंद करण्यात आल्यामुळे खेळाडु व जलतरण शिकण्यासाठी येणाऱ्या सर्व डोंबिवलीकरांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अनिश्चित कालावधीसाठी बंद असे उत्तर नागरिकांना प्रशासनाकडून देण्यात आले आहे त्यामुळे आणखीनच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

येथील ठेकेदाराचा कालावधी हा ऑगस्ट महिन्यातच संपला. वाढीव मुदतीसाठी अर्ज करत त्यांनी पुढील तीन महिने त्याची देखभाल दुरुस्ती केली. मात्र तो मुदत कालावधी उलटला तरी अद्याप त्यांना मंजुरी न मिळाल्याने अखेर पालिका अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरूनच हा तलाव बंद करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे.

डोंबिवली पूर्वेतील संत सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरण तलाव आहे. कोरोना काळात हा तलाव बंद होता. येथे लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानंतर तलावाची दुरावस्था झाल्याने मागील वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत हा तलाव बंदच होता.

पालिका प्रशासनाने कोट्यावधी रुपये खर्च करत या तलावाची दुरुस्ती केली आणि नागरिकांना पोहण्यासाठी येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मार्च ते ऑगस्ट महिन्याच्या कालावधीसाठी ठेकेदारास याचे कंत्राट देण्यात आले होते. ऑगस्ट महिन्यात ठेकेदाराची मुदत संपली. त्यानंतर वाढीव तीन महिन्यांच्या मुदतीसाठी त्यांनी पालिकेत अर्ज केला आहे.

मात्र ती प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. तीन महिन्यांची मुदत मंजुरी न मिळाल्याने पुढे तरण तलाव सुरू कसा ठेवायचा असा प्रश्न असल्याने अखेर हा तलाव ठेकेदारास वाढीव मुदत न मिळाल्याने 1 डिसेंबर पासून बंद करण्यात आला आहे. अनिश्चित कालावधीसाठी बंद अशी सूचना येथे पोहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना देण्यात आले आहे.

तलाव सुस्थितीत सुरळीत सुरू असताना अचानक का बंद करण्यात आला ? कधी सुरू होणार हे देखील सांगण्यात येत नाही. तसेच भरलेल्या फीचे काय ? असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले असल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे. याप्रश्नी काही नागरिकांनी मनसेचे मनोज घरत यांना संपर्क साधत तक्रार केली आहे.

तरण तलाव बंद करण्यात आलेले नाही. कंत्राटदाराच्या मुदत वाढीसाठी तो थोडा प्रलंबित आहे. मुदतवाढ मिळताच तो सुरू करण्यात येईल.

- मनोज सांगळे, कार्यकारी अभियंता बांधकाम डोंबिवली विभाग

आमच्याकडे लोकांच्या तक्रारी आलेल्या आहेत. मालमत्ता विभागाचा अनागोंदी कारभार सुरू असल्याचे यावरून दिसते. कंत्राटदाराला मुदतवाढ दिलेली नाही. तसेच तरणतलाव खासगीकरणाचा घाट देखील घातला जात आहे. एकाच अधिकाऱ्याला अनेक खाती दिल्याने दुर्लक्ष होत आहे. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष घालावे.

- मनोज घरत, मनसे पदाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT