Building in kalyan
Building in kalyan sakal media
मुंबई

कल्याणच्या 'त्या' प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई; आयुक्तांचे आदेश

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका (KDMC) क्षेत्रात अनधिकृत बांधकामाचे (Illegal Work) पेव फुटले आहे. पालिका प्रशासन कारवाई (Municipal action) करत असले तरी बांधकामे आजही सुरूच आहेत. या बांधकामांना पालिका अधिकाऱ्यांचेच अभय असल्याच्या चर्चा वारंवार होतात. अशीच एक चर्चा गेल्या दोन दिवसंपासून रंगली आहे. कल्याण ग्रामीणमधील एका अनधिकृत इमारतीवर (Illegal building) कारवाई होऊ नये म्हणून पालिका अधिकाऱ्यांना पैसे दिले, मात्र तरीही इमारतीवर कारवाई केल्याचा आरोप (builder Claims) एका विकासकाने केला आहे. यावर पालिका आयुक्तांनी या प्रकरणात चौकशी करून कोणी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.

कल्याण ग्रामीण मधील दावडी परिसरात डीपी रस्त्यात येणाऱ्या सहा मजली बेकायदा इमारतीवर केडीएमसीने चार पाच दिवसापूर्वी कारवाई केली. ही कारवाई आत्ता वादात सापडली आहे. कारवाई झाल्यानंतर विकासक मुन्ना सिंग याने पालिका प्रशासनावर आरोप केले आहेत या इमारतीवर कारवाई न करण्यासाठी अधिकाऱ्यानी वारंवार पैसे घेतले आहेत. काही दिवसांपूर्वीच एका हॉटेलमध्ये विकासक सिंग याने पालिका अधिकारी दीपक शिंदे, उपायुक्त अनंत कदम यांची बैठक झाली. या बैठकीचे हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज सिंग यांनी समोर आणीत अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत.

याविषयी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, याबाबत माझ्याकडे कोणतीही तक्रार प्राप्त नाही. अनधिकृत इमारत होती आणि ते तोडण्याचे आदेश देण्यात आले होते. यामध्ये कोणाची काही तक्रार असेल तर त्या तक्रारीची शहानिशा करून दोषी कोणी आढळले तर कारवाई केली जाईल. विकासक सिंग यांच्या आरोपात कितपत तथ्य आहे हे चौकशी नंतर स्पष्ट होईल. मात्र संबंधित अधिकारी विकासकसोबत त्यावेळी नक्की काय चर्चा करीत होते अशी चर्चा रंगली आहे.

जो सापडला तो चोर

"महापालिका प्रशासन सर्वच भ्रष्ट आहेत फक्त जो सापडला तो चोर. अनधिकृत बांधकामे एका रात्रीत उभे राहत नाही. ठाण्या पासून डोंबिवलीपर्यंत अधिकाऱ्यांचा आशिर्वाद असल्यानेच उभी राहतात. केवळ अनधिकृत नाही तर अधिकृत बांधकाम करण्यासाठीही काही टक्केवारी घेतले जाते. दुर्दैव आहे की याविषयी कोणीच आवाज उठवत नाही."

- राजू पाटील, कल्याण ग्रामीण, आमदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amethi Constituency Election Result: अमेठीत स्मृती इराणींचा पराभव; किशोरी लाल शर्मा यांचा दणदण विजय

Mumbai North West Loksabha Result: ईशान्य मुंबईत कीर्तिकरांनी उडवला विजयाचा गुलाल; 2000 मतांनी केला वायकरांचा पराभव!

Maharashtra Lok Sabha Election Results Live : सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटलांचा १ लाख १ हजार १९४ मतांनी विजय

Maval Constituency Lok Sabha Election Result : मावळमधून संजोग वाघेरे पराभूत, श्रीरंग बारणेंची हॅट्रिक

India Lok Sabha Election Results Live : अयोध्येत भाजपचा पराभव! तीनशेचा आकडा गाठता गाठता आलं नाकी नाकी नऊ! इंडिया आघाडीची मोठी कामगिरी

SCROLL FOR NEXT