मुंबई

मनसेला 24 तासात दुसरा मोठा धक्का, शिवसेनेनंतर मनसेचा मोठा नेता भाजपमध्ये

शर्मिला वाळुंज

मुंबईः कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर डोंबिवलीत राजकीय उलथापालथ होण्यास सुरुवात झाली आहे.  मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. हा धक्का मनसेला पचवता आला नाही तोच मंगळवारी सकाळी मनसेचे नगरसेवक आणि माजी विरोधीपक्षनेते मंदार हळबे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

मनसे पक्षातील मंदार हळबे हे देखील राज ठाकरे यांचे निकटवर्तीय असून डोंबिवलीतील दुसरा महत्त्वाचा चेहरा होते. या दोन मुख्य पदाधिकाऱ्यांच्या पक्ष सोडण्याने मनसेचे डोंबिवलीतील अस्तित्व काहीसे डळमळीत झाले असून, मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे आता येत्या महापालिका निवडणुकीत मनसे पक्षाची धुरा कशी पेलतात हे पाहावे लागेल. 

मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, मनविसेचे सागर जेधे यांच्या शिवसेना प्रवेशासोबतच मनसेचे आणखी काही पदाधिकारी पक्षाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा कालपासूनच शहरात होती. मनसेचे माजी विरोधी पक्षनेते आणि गटनेते मंदार हळबे मंगळवारी सकाळी दादर येथील भाजप पक्ष कार्यालयात दाखल झाले. मंदार हळबे यांनीही पक्षाला रामराम ठोकल्याचे शिक्कामोर्तब झाले.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेने पाठोपाठ भाजपनेही मनसेला जबर धक्का दिला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 2015 च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यातील वादामुळे ही निवडणूक चांगलीच गाजली होती. 

निवडणूक विरोधात लढल्यानंतर मात्र शिवसेनेने भाजपशी युती करत महापालिकेत सत्ता स्थापन केली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शिवसेना भाजपची युती महापालिकेतही तुटली. येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला जोरदार टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. दुसरीकडे भाजपनेही तिन्ही पक्षांविरोधात कंबर कसली असून सध्या सर्वत्र कार्यकर्ते फोडाफोडीचे राजकारण रंगत असल्याचे दिसून येते. डोंबिवलीतील मनसे पक्षाला याचा पहिला फटका बसला असून पक्षातील दोन महत्त्वाच्या चेहऱ्यांनी पक्षाला रामराम करीत शिवसेना - भाजपामध्ये प्रवेश केला आहे. 

राजेश कदम यांच्या शिवसेना प्रवेशानंतर मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी समाज माध्यमावर आम्ही राज ठाकरे साहेबांसोबतच असे संदेश व्हायरल करण्यास सुरुवात केली होती. तरीही काही मनसैनिक पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहितीही वाऱ्यासारखी पसरत होती. मंदार हळबे यांचे नाव त्यात आघाडीवर होते, हळबे हे शिवसेना की भाजपमध्ये प्रवेश करणार याविषयी अनेकांमध्ये चर्चा रंगली होती. 

मंदार हळबे यांच्यावर संघाचा पगडा असल्याने ते भाजपचीच वाट धरतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात कालपासून होती. मंगळवारी अखेर त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याने आता मनसेचे डोंबिवलीतील स्थान डळमळीत झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. डोंबिवलीतील या राजकीय हालचाली पहाता मनसेचे आमदार राजू पाटील हे राज ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यास त्यांच्या बंगल्यावर गेले असल्याचे समजते.

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

kdmc mns corporator mandar halbe entre bjp

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT