Kalyan railway station Kidnapping Case esakal
मुंबई

Kidnapping Case : 4 मुलीच आहेत म्हणून 4 वर्षाच्या चिमुरड्याचं केलं अपहरण; रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार

मुलाच्या हव्यासापोटी त्यानं केलं चार वर्षाच्या चिमुकल्याचं अपहरण

शर्मिला वाळुंज

कचरू वाघमारे याला चार मुली होत्या. त्याला मुलगा हवा होता. मुलाच्या हव्यासापोटी त्यानं चार वर्षाच्या चिमुकल्याचं अपहरण केल्याचं समोर आलं आहे.

डोंबिवली : साबण आणण्यासाठी आई-वडील बाहेर गेले आणि हीच संधी साधत एका जोडप्यानं कल्याण रेल्वे स्टेशन वरील (Kalyan Railway Station) वेटिंग रूममधून 4 वर्षीय मुलाचं अपहरण केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.

कल्याण रेल्वे गुन्हे शाखेनं 8 तासांत मुलाचा शोध घेत त्याची आई-वडिलांशी भेट घडवून दिली. अपहरणकर्ता कचरू वाघमारे हा मुलाला घेऊन नाशिकला जाण्याच्या घाईत होता. मात्र, त्याआधीच त्याच्या हातात पोलिसांच्या बेड्या पडल्या.

कचरू याला 4 मुली आहेत. मुलाच्या हव्यासापोटी त्यानं मुलाचं अपहरण करण्याचा विचार केला आणि हा मार्ग त्याला गजाआड करून गेला. मोलमजुरीचं काम करून गुजरान करणारे करण गुप्ता व त्याची पत्नी शुभांगी गुप्ता हे कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात राहतात. त्यांना 4 वर्षाचा अथर्व आणि 2 वर्षाची कीर्ती अशी दोन मुले आहेत.

Kalyan railway station

सोमवारी सकाळी गुप्ता दाम्पत्य कपडं धुण्यासाठी रेल्वे स्टेशनवरील वेटिंग रूममध्ये आले होते. मात्र, साबण नसल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. गुप्ता यांची दोन्ही मुले वेटिंग रूममध्ये खेळत होती. तेथे एक जोडपे व 4 मुली गुप्ता यांच्या मुलांसोबत खेळत होते. त्यांना मुलांवर लक्ष ठेवण्यास सांगून करण व शुभांगी हे साबण आणण्यासाठी स्टेशनच्या बाहेर गेले.

परत ते त्या ठिकाणी आल्यावर पाहतात तर तेथे फक्त कीर्ती एकटीच होती. अथर्व तसेच वेटिंग रूम मध्ये असलेल्या 4 मुली व एक जोडपे गायब झाले होते. गुप्ता यांच्या पायाखालची जमीनच सरकली. दरम्यान, करणने आजूबाजूला आपल्या मुलाचा शोध घेतला. मात्र, मुलगा आढळून आला नाही. अखेर त्याने कल्याण रेल्वे गुन्हे पोलीस ठाणे गाठले. कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने तत्काळ या मुलाचा शोध सुरू केला.

स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासले. मुलाच्या शोधासाठी पथके नेमली. सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास एक इसम अथर्वला घेऊन कल्याण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर आढळून आला. हा इसम नाशिकला जाणारी ट्रेन पकडण्याच्या घाईत होता. रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने या इसमावर झडप घालत त्याला ताब्यात घेतलं व मुलाची सुटका केली.

चौकशी दरम्यान या इसमाचे नाव कचरू वाघमारे असल्याचं समोर आलं. कचरू वाघमारे याला चार मुली होत्या. त्याला मुलगा हवा होता. मुलाच्या हव्यासापोटी त्यानं चार वर्षाच्या चिमुकल्याचं अपहरण केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी कचरूला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

NHAI action on Toll Plaza: लष्करी जवानाला बेदम मारहाण प्रकरणात 'NHAI'चा संबधित 'टोल प्लाझा'ला जबरदस्त दणका!

Central Government: मोदी सरकार देणार १५ हजार रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन

Mumbai: रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

SCROLL FOR NEXT