'ती' घराबाहेर पडली, पण परतलीच नाही; पाहा नेमकं काय घडलं..
'ती' घराबाहेर पडली, पण परतलीच नाही; पाहा नेमकं काय घडलं..  
मुंबई

'ती' मुलीसह घराबाहेर पडली, पण परतलीच नाही; पाहा नेमकं काय घडलं..

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : सानपाडा सेक्‍टर 5 येथून एका विवाहिता तिच्या बहिणीच्या सात वर्षीय मुलीला घेऊन बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी पोलिस व नातेबाईक दोघींचा शोध घेत आहेत. सानपाडा पोलिसांनी या महिलेच्या विरोधात मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. 

रेश्‍मा पुजारी (वय 22 ) असे बेपत्ता विवाहितेचे नाव आहे. रेश्‍मा हि तीच्या मोठया बहिणीची मुलगी अनुष्का हिच्यासह 22 डिसेंबर रोजी अचानक बेपत्ता झाली आहे. रेश्‍मा पुजारी हिचा विवाह झाला असून ती मुंब्रा येथे पतीसह रहाण्यास होती. गत ऑक्‍टोबर महिन्यामध्ये ती बाळंतपणासाठी सानापाडा सेक्‍टर-5 येथे आई-वडीलांच्या घरी आली होती. रेश्‍माच्या मुलाचा मृत्यू झाल्यापासून ती आपल्या वडीलांच्याच घरी राहत आहे. 

दरम्यान, रेश्‍माची मोठी बहिण सुकेशना हणवते ही देखील पती व आपल्या मुलांसह वडीलांच्या घरी रहाण्यास आहे. 22 डिसेंबर रोजी रात्री 9.30 वाजता रेश्‍मा अनुष्कासोबत घराबाहेर पडली होती. मात्र त्यानंतर दोघी रात्री उशीरापर्यंत घरी परतल्या नाहीत. त्यामुळे सकेशना हिने सानापाडा पोलीस ठाण्यात बहिण रेश्‍मा हिने मुलगी अनुष्काला पळवून नेल्याबाबतची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी बेपत्ता रेश्‍मा हिच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तीचा शोध सुरु केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: शाहरुख खानचे दमदार अर्धशतक, गुजरातने पार केला 120 धावांचा टप्पा

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT