मुंबई

Kirit Somaiya | 'चार इंच वर दगड लागला असता तर मी आंधळा झालो असतो'

ओमकार वाबळे

भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी जोरदार दगडफेक केल्याची घटना समोर आली. यानंतर मुंबईत रात्रभर मोठं राजकीय नाट्य रंगलं. किरीट सोमय्यांनी गाडीतून उतरण्यास नकार दिला. (Kirit Somaiya Attacked in Mumbai)

पोलिसांनी त्यांना विनंती केल्यानंतर सोमय्यांनी एफआयआर दाखल केली. मात्र, पोलिसांनी खोटी माहिती लिहून घेतल्याचं सांगितलं. तर, सोमय्यांनीच आमच्या अंगावर गाडी चढवली असा आरोप शिवसैनिकांनी केला. आणि आता एकमेकांविरोधात तक्रार दिलीय. यानंतर सोमय्यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर आणि पोलिसांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. हा मला मारण्याचा कट होता असं ते म्हणाले.

माझ्यावर झालेला हल्ला मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी केलेलं षडयंत्र आहे. आधी पोलीस सिक्युरिटी असल्याचं सांगितलं. त्यानंतर मला सात-आठ पोलिसांनी शिवसैनिकांच्या हवाली केलं. या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. मला आंधळं करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंचा होता. चार इंच वर दगड लागला असता तर मी आंधळा झालो असतो, असं सोमय्यांनी म्हटलंय.

  • ठाकरे सरकार गुंडगिरी करतात माफिया गिरी करयात घोटाळे करतात

  • ठाकरे साहेब उत्तर द्या काल fir का घेतली नाही

  • भारतीय जनता पक्ष गेली बारा वर्ष सर्व प्रकारचे घोटाळे बाहेर काढत आहे

  • काल माझ्या वर जो हल्ला झाला तो ठाकरे सरकारने स्पॉन्सर केले हल्ला होता

  • मी पोचण्या पूर्वी 70 ते 80 शिवसेनिकांची व्यवस्था केली होती

  • मला शिवीगाळ करत माझ्यावर हल्ला

  • 70 ते 80 शिवसेनीक माझ्या वर

  • या सर्वला संजय पांडे जबाबदार आहेत

  • ठाकरे सरकारची काम करण्याची क्षमता संपली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत मोठा अनर्थ टळला! मोटरमनच्या क्षणभराच्या चुकेने प्रवाशांचा थरकाप, भांडूप स्थानक आलं तरी लोकल थांबली नाही, काय घडलं?

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणात मोठी उलथापालथ, भाजप अध्यक्षपदाच्या दिशेने

पुण्याची बातच न्यारी! मृणाल ठाकूरने पुण्यात येताच केली 'ही' गोष्ट, खास मराठी पोस्ट करत म्हणाली... 'पुण्यात आलो आणि...'

Indore Fire Accident : इमारतीला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू; इलेक्ट्रिक कार चार्जिंग करताना शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना

SCROLL FOR NEXT