मुंबई

ठाकरे सरकार, किशोरी पेडणेकर, मुंबई महापालिका आणि SRA विरोधात सोमय्यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

सुमित बागुल

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधलाय. आज किरीट सोमय्या यांनी पुन्हा मुंबईत पत्रकार परिषद घेतली. आजची सोमय्या यांची सलग तिसऱ्या दिवशी तिसरी पत्रकार परिषद होती. दिवाळीआधी मी शिवसेनेचे तीन घोटाळे समोर आणीन असं म्हटलं होतं, ते वचन मी पूर्ण करत असल्याचं पत्रकार परिषदेत सोमय्या म्हणालेत. 

मुंबई महापौरांनी SRA योजनेत गाळे लाटल्याचा आरोप सोमय्या यांनी किशोरी पेडणेकरांवर केला. किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात सोमय्या यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित दाखल केलीये. यासोबतच अल्पेश अजमेरा सोबत झालेल्या जमीन व्यवहारावर देखील किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेतलाय. याबाबत राज्यपालांना देखील महिती दिली असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लोकायुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत असं सोमय्या म्हणालेत. 

किरशोरी पेडणेकरांवर काय केलेत आरोप  :

सोमय्या म्हणालेत, "मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी मोठ्या प्रमाणात गरीब आणि झोपडपट्टी वासियांसाठी असलेले गाळे हडप केले. स्वतः त्या हे मान्य करतात की, महापौर पदावर असताना, नगरसेवक असताना स्वतःच्या परिवाराच्या कंपनीला कंत्राट मिळवून देणे. याचा  सातत्याने ठाकरे सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर ही SRA नी, मुंबई महापालिकेने , मुंबई पोलिसांनी मुंबई महापौरांवर काहीही कारवाई केली नाही. म्हणून काल मुंबई उच्च न्यायालयात आम्ही किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात सोबतच ठाकरे सरकार, मुंबई महापालिका आणि SRA विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे" असं सोमय्या म्हणालेत. 

काय आहे अजमेरा बिल्डर प्रकरण : 

दहिसरमधील अजमेरा बिल्डरने विकत घेतलेली जमीन आता मुंबई महानगर पालिका विकत घेणार आहे. अजमेरा बिल्डरने या जमिनीसाठी दोन कोटी ५५ लाख  रुपये मोजले होते. मात्र मुंबई महानगरपालिकेला या जमिनीसाठी तब्बल ९०० कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान या व्यवहारातील ३०० कोटी रुपये अजमेरा बिल्डर्सला देण्यात आले आहेत, हे सर्व आरोप आरोप किरीट सोमय्या यांनी केलेत.

दरम्यान आपण कधीही पुराव्याशिवाय बोलत नाही, म्हणून आता संजय राऊत आणि शिवसेना प्रवक्त्यांनी बोलावं असं आवाहन सोमय्या यांनी केलं आहे.

kirit somayya filed petition against kishori pednekar BMC SRA and thackeray sarkar in bombay HC

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

SCROLL FOR NEXT