मुंबई

'या' होणार मुंबईच्या नव्या महापौर ?

सकाळ वृत्तसेवा

देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि म्हणूनच देशातील सर्वात महत्त्वाची महानगरपालिक म्हणजे मुंबई महानगरपालिका. राज्यातील महानगरपालिकांच्या महापौर पदाची मुदत २१ नोव्हेंबरला संपतेय. अशातच बुधवारी मंत्रालयात आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी आरक्षित झालं. यामुळे मुंबईचा महापौर कोण? याबाबत प्रचंड उत्सुकता होती.

दरम्यान, आता मातोश्रीच्या  आदेशावरून आता मुंबई महापौर पदासाठी शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपमहापौर पदासाठी नगरसेवक अँड. सुहास वाडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयुक्त सचिवांकडे किशोरी पेडणेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.  

2022 ला मुंबईचा महापौर भाजपचाच..

संख्याबळ नसल्याने आम्ही मुंबई महापौरपदाची निवडणूक न लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. 2022 ला मुंबईचा महापौर भाजपचाच असेल. भाजप मुंबई महापौर पदाची निवडणूक लढविणार नाही, अशी माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली आहे. शेलार यांनी ट्विट करत म्हटले आहे, की मुंबई महापालिकेत आम्ही आता तुल्यबळ आहोत. मात्र संख्याबळ नाही. विरोधी विचारांच्या जीवावर आता अभद्र करणार नाही. मात्र 2022 चा मुंबईचा महापौर स्वबळावर आणि संख्याबळावरही!
 

मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. गेले 20 वर्ष मुंबईत शिवसेनेची सत्ता आहे. आणि त्यामुळेच मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद अत्यंत प्रतिष्ठेचं मानलं जातं. दरम्यान महापौरपदासाठी इच्छुकांची यादी मोठी होती. यामध्ये समाधान सरवणकर, किशोरी पेडणेकर, आशिष चेंबूरकर, मंगेश सातमकर, शुभदा गुढेकर यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार याबाबत चर्चा होती. 

मुंबई महानगरपालिकेतील पक्षीय बलाबल

  • शिवसेना - 94
  • भाजप - 83
  • काँग्रेस - 28
  • राष्ट्रवादी - 8
  • सपा - 6
  • मनसे - 1
  • एमआयएम - 2
  • एकूण - 222 जागा
  • आणि 5 नगरसेवकांचा जातप्रमाणपत्र प्रॉब्लेम
     

Webtitle : kishori pednekar may become next mayor of mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT