मुंबई

विमान दुर्घटनेची बातमी आली आणि साठे कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली...

सुमित बागुल

मुंबई : काल केरळच्या कोझिकोडमध्ये एक भीषण अपघात घडला. दृश्यमानता कमी असल्याने विमान धावपट्टीवरून सरकलं आणि पुढे दरीत पडून भीषण अपघात झाला. या अपघातात दोन वैमानिकांच्या दुर्दैवी मृत्यू झालाय.यापैकी एक वैमानिक हे मुंबईचे रहिवासी होते. या विमानात क्रू मेंबर्ससह एकूण १९१ लोकं होती. या अपघातात मृत्यूमुखी पडलेले वैमानिक दीपक वसंत साठे हे मुंबईतील पवई भागात राहणारे होते.

कोण होते दीपक वसंत साठे ? 

  • दीपक वसंत साठे हे भारतीय वायुदलाचे पायलट होते. हवाई दलातील लढाऊ वैमानिक म्हणून त्यांनी सेवा दिली होती  
  • त्याचा प्रवास सुरु झाला पुण्याच्या नॅशनल डिफेन्स अकॅडमी पासून.
  • NDA मधून प्रशिक्षण घेतल्यानंतर ते १९८१ मध्ये भारतीय वायुदलात रुजू झालेत. 
  • १९८१ ते २००३ असा त्यांनाच भारतीय वायुदलात कार्यकाळ राहिला.
  • त्यानंतर त्यांनी भारतीय हवाई दलातून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि एअर इंडियामध्ये वैमानिक म्हणून रुजू झालेत.
  • दीपक वसंत साठे हे एअर फोर्स अकॅडमी प्रशिक्षणही अग्रेसर राहिलेत.  
  • त्यांनी HAL म्हणजेच हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये टेस्ट पायलटची अत्यंत कठीण भूमिकाही पार पडलीये

दरम्यान, विमान दुर्घटनेची माहिती मिळताच साठे यांच्या परिवारात शोककळा पसरली. हा अपघात इतका भीषण होता की ३५ फूट खाली दरीत विमान कोसळून बलाढ्य बोईंग ७३७ विमानाचे अक्षरशः तुकडे दोन तुकडे झालेत. वंदे भारत मिशन अंतर्गत दुबईत अडकलेल्या भारतीयांना घेऊन हे विमान परतत होतं. या विमानातील एकूण नारिकांपैकी १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी आता समोर येतेय. या घटनेत को पायलट अखिलेश कुमार यांचा देखील मृत्यू झालाय. 

दरम्यान, या अपघाताच्या खोलात जाऊन हा अपघात नक्की कशामुळे झाला याबाबत DGCA आता सखोल चौकशी करणार आहे. या विमानातील डिजिटल फ्लाईट रेकॉर्डर देखील आता हस्तगत करण्यात आलाय. 

Kozhikode Air India Express crash pilot deepak vasant sathe and his life journey

Mumbai 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT