file photo 
मुंबई

दोघांचं भांडण तिसऱ्याचा मर्डर..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पती-पत्नीचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मेहुण्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार आग्रीपाडा येथे घडला. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी भाऊजीला अटक केली आहे. 

हे ही वाचा....या कार्यक्रमामुळे कर्करोगग्रस्तांमध्ये निर्माण झाली जगण्याची आशा 

आरोपी राजेश बोरीचा व त्याची पत्न हंसा यांच्यात घरगुती वाद सुरू होते. त्यावेळी हंसाचा भाऊ विनोद बिजल मोखरा हा या दोघांमधील भांडण सोडवण्यासाठी आला होता. त्यावेळी वादानंतर राजेश विनोदला धोबीघार येथील जेआरबोरीचा मार्ग येथील जे इमारतीच्या खाली घेऊन गेला. तेथे दोघांमध्ये या विषयांवरून वाद झाला. या वादात रागाच्या भरात राजेशने विनोदच्या पोटात चाकू भोसकला. त्यानंतर विनोदला तात्काळ रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले.

याप्रकरणी विनोदचा भाऊ गिरधर याच्या तक्रारीवरून आग्रीपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून राजेशला अटक केली. राजेशने विनोदच्या छातीच्या खाली डाव्या बाजूला पोटात व डोक्‍याच्या उजव्या बाजूला वार केले. पोटातील जखम गंभीर झाल्याने विनोदला वाचवणे शक्‍य झाले नाही. आरोपीने पत्नीलाही यापूर्वी मारहाण केली होती, असे तक्रारीत म्हटले आहे. 

in law gets killed while resolving fight of husband and wife 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

SCROLL FOR NEXT