मुंबई

जलवाहिनी फुटून जमलेल्या पाण्यात लीक झाला होता करंट, झटक्याने दोन BMC कर्मचारी दगावलेत

अनिश पाटील

मुंबई, ता.19 : जलवाहिनी दुरूस्तीचे काम करण्यासाठी पाण्याने भरलेल्या खड्ड्यात उतरलेल्या सात पालिका कर्मचा-यांना वीजेचा झटका बसल्याची गंभीर घटना कुर्ला पूर्व परिसरात घडली. या अपघातात दोन कर्मचा-यांचा मृत्यू झाला असून पाच कर्मचारी जखमी झाले आहे. नेहरू नगर पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली आहे. अमोल काळे (वय 40, चेंबूरमध्ये राहणारे) आणि गणेश उगले (वय 45 कल्याणमध्ये राहणारे  अशी मृत कामगारांची नावे आहेत. तर या घटनेत महेश जाधव ( वय 40 वर्षे ) नानासाहेब पुकळे (वय 41 वर्षे ), नरेश आंधळे (वय 40 वर्षे ), राकेश जाधव (वय 39 वर्षे ) आणि अनिल चव्हाण ( वय 43 वर्षे ) अशी जखमी कामगारांची नावे असल्याची पालिकेकडून सांगण्यात आले.

कुर्ला पूर्व परिसरातील पूर्व द्रुतगती महामार्गावर आण्णाभाऊ साठे उड्डाण पूलाजवळ मुंबई महानगरपालिका कडून नाला रूंदीकरणाचे काम सुरू होते. या कामादरम्यान तेथील जमीनीखाली असलेली जलवाहिनी फुटली, तीचे दुरूस्तीचे काम सुरू होते. दुरूस्तीसाठी त्या ठिकाणी 20 फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता. पण जनवाहिनी फुटल्यामुळे या खड्यात पाणी जमा झाले. त्या खड्ड्यात जमा होणारे पाणी काढण्यासाठी 4 ते 5 पंप बसविण्यात आले आहेत. ते चालविण्यासाठी 4 ते 5 जनरेटर बसविण्यात आले आहेत. सोमवारी सकाळी 8 च्या सुमारास 7 कामगार त्या खड्यात काम करत असताना त्यांना कामगारांना विजेचा धक्का बसला. त्यात काळे व उगळे या दोन कर्मचाऱ्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. उर्वरीत कर्मचाऱ्यांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दोन कर्मचाऱ्यांच्या मृत्यप्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे

खासदार राहुल शेवाळे यांची प्रतिक्रिया

सुमन नगर येथे सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामाच्या ठिकाणी दोन पालिका कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. घटनास्थळी पाहणी केल्यावर कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सबमर्सिबल पंप हाताळण्यात झालेल्या निष्काळजीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडली. मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी या घटनेची सखोल चौकशी करायला हवी. तसेच मृतांच्या नातेवाईकांना तसेच जखमींना नुकसानभरपाई आणि मृतांच्या वारसांना पालिकेत नोकरी द्यावी, अशी मी मागणी करतो. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी जल विभागाच्या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, असं खासदार राहुल शेवाळे म्हणालेत.

( संपादन - सुमित बागुल ) 

leakage of underground water line water logging and leakage of current two died

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हार्दिक पांड्या-माहिका शर्मा दिवाळी सेलिब्रेशनसाठी केलं 'मॅचिंग मॅचिंग'; रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण

Diwali Celebration : वसई विरार मध्ये शिवरायांच्या किल्ल्याचे दर्शन; ठीक ठिकाणी उभारण्यात आले आहेत इतिहास कालीन किल्ले

Balipratipada and Padwa 2025: बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा एकाच दिवशी का साजरा करतात? जाणून घ्या शुभ मुहूर्त

Fursungi Nagar Parishad Election : फुरसुंगी नगरपरिषद निवडणुकीसाठी महापालिकेचे ३५ कर्मचारी नियुक्त

Nagpur News: नागपूरला विकासाची नवी गती मिळणार, तिसरा रिंगरोड मल्टीमॉडल कॉरिडॉर बनणार; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

SCROLL FOR NEXT