मुंबई

तो ई-मेल माझाच, मुख्यमंत्री कार्यालयाला परमबीर सिंग यांचं स्पष्टीकरण 

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई पोलिस आयुक्त पदावरून उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी शनिवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे उद्दिष्ट दिले होते, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पण, ज्या पत्रावरून राज्यात एवढी मोठी खळबळ उडाली. त्या पत्रावरच शंका उपस्थित केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाकडू पत्राबात शंका उपस्थित करण्यात आली होती. पण यावर आता परमबीर सिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना परमबीर सिंग यांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवेलं पत्र माझ्याच ई-मेल आयडीवरुन पाठवलं आहे. परमबीर सिंग यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेनंतर आता राजकीय वातावणर आणखी तापण्याची शक्यता आहे. यावर मुख्यमंत्री कार्यालायाकडू काय स्पष्टिकरण येतेय हे पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे. 

मुख्यंमत्री कार्यालयानं काय म्हटलं होतं? 
परम बीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर आज दुपारी 4.37 वाजता पत्र प्राप्त झाले आहे. paramirs3@gmail.com या ईमेल पत्त्यावरून परम बीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे , त्याचप्रमाणे परम बीर सिंग यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वास्तविक पाहता परम बीर सिंग यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ईमेल पत्ता parimbirs@hotmail.com असा आहे त्यामुळे आज प्राप्त झालेला ईमेल तपासून घेणे आवश्यक आहे असे मुख्यमंत्री कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात येते.

काय आहेत आरोप?

  • गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना वसुली करण्याचे आदेश दिले होते.
  • महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिले होते.
  • या संदर्भात मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील इतर नेत्यांना याची माहिती दिली होती.
  • भाजप नेते मोहन डेलकर प्रकरणात चुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव टाकला

अनिल देशमुखांची बाजू

  • सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंग एवढे दिवस शांत का बसले होते? त्याचवेळी त्यांनी आपले तोंड का उघडले नाही ?
  • पोलीस खात्यातील सर्वांना माहीत आहे की सचिन वाझे व एसीपी संजय पाटील हे परम बीर सिंग यांच्या अत्यंत जवळचे
  • सचिन वाझे यांनी जर फेब्रुवारी मध्ये परमबीर सिंह यांना भेटून हे सर्व सांगितल्याचे परमबीर सिंग म्हणतात तर त्याच वेळी त्यांनी का सांगितले नाही. एवढे दिवस शांत का होते?
  • विस्फोटक प्रकरणात आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी असे खोटे आरोप करून सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : मुंबईत काँग्रेसचा ‘वोट चोरी’ घोटाळ्याचा आरोप

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT