मुंबई

मुंबईत १५ कोटींचे द्रवरूप कोकेन जप्त

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून साडेपाच किलो द्रवरूप कोकेनसह दोन परदेशी महिलांना अटक करण्यात आली. या उच्च प्रतीच्या कोकेनची किंमत १५ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. द्रवरूप कोकेनमध्ये भेसळ करून ५० किलोपेक्षा जास्त कोकेनची भुकटी बनवली जाऊ शकते. या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय ड्रग माफियांपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात आले.

मेरेलेस गार्सिया युरिंका इलिमार (३१, वेनेझुएला) व हाड्री वेनेस्का विनहास कोस्टा (२१, ब्राझील) असे अटक करण्यात आलेल्या परदेशी महिलांची नावे आहेत. विमानतळावरील ग्रीन कॉरिडॉरपर्यंत आल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आले. मेरेलेसकडे तीन किलो १८० ग्रॅम आणि हाड्रीकडे दोन किलो १९० ग्रॅम उच्च प्रतीचे द्रवरूप कोकेन सापडले. या तस्करीचे धागेदोरे दक्षिण अमेरिकेतील अमली पदार्थ माफियांपर्यंत पोहोचले आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

उच्च प्रतीच्या कोकेनमध्ये भेसळ करून बनवलेली भुकटी किरकोळ बाजारात विकली जाते. ही प्रक्रिया सोपी असल्यामुळे कोकेनला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. या परदेशी महिलांकडून जप्त करण्यात आलेल्या द्रवरूप कोकेनपासून ५० किलोपेक्षा जास्त भेसळयुक्त कोकेन बनवले जाऊ शकते. त्यानंतर त्याची किंमत अब्जावधी रुपयांवर जाते. 

द्रवरूप कोकेन अधिक घातक
द्रवरूप कोकेनची खाण्याच्या पदार्थांमधून तस्करी केली जाते. अमेरिकेत ही कार्यपद्धती फार पूर्वीपासून सुरू असून आता भारतातही सुरुवात झाली आहे. या द्रवरूप कोकेनचे पावडरमध्ये रूपांतर केले जाते आणि समाजमाध्यमांवरून ऑर्डर घेतल्या जातात. संशय येऊ नये, यासाठी तस्करीत विशेष करून महिलांचा वापर केला जातो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT