मुंबई

मुंबईकरांनो लोकलमधून प्रवास करायचाय? लागेल हे विशेष QR कार्ड

सुमित बागुल

मुंबई : मुंबईतील लोकल ट्रेन्स म्हणजे मुंबईची लाईफलाईन. तुम्हाला मुंबईतील एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पटकन आणि वेळेत पोहोचवणारा एकमेव पर्याय. मात्र कोरोनामुळे पहिल्यांदाच लोकल ट्रेन्स अनेक महिने बंद आहेत. लोकलमधील गर्दी पाहता मुंबईच्या लोकल या कोरोना बॉम्ब बनतील या भीतीने मुंबईतील लोकल्स सर्वसामान्यांसाठी अजूनही बंद आहेत.

खरंतर गेल्या महिन्यातच १५ तारखेला अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबई लोकल पुन्हा ट्रॅकवर आली. लोकल सुरु करण्याआधी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना QR कोड असलेलं कार्ड देण्यात यावं अशी अट घातली होती. आज १५ जुलै, म्हणजेच एक महिना उलटूनही सर्व कर्मचाऱ्यांना QR कोड असलेले कार्ड्स देण्यात आलेले नाहीत. मात्र रेल्वेतील अधिकारी आणि सरकारकडून QR कोड असलेले कार्ड्स बनवण्याचं काम सुरु असल्याचं सांगितलं जातंय आणि पुढील आठवड्यापासून हे कार्ड्स वाटले जातील अशी माहिती आता समोर येतेय. 

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार आणि पश्चिम रेलवेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली. शिवाजी सुतार म्हणालेत QR कोड असलेले कार्ड्स बनवण्याचं काम सुरु आहे.  येत्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना हे कार्ड्स वितरित केले जातील. याबाबत सरकारसोबत मध्य रेल्वेकडून समन्वय साधला जात असल्याचीही माहिती त्यांनी दिली. तर सुमित ठाकूर म्हणालेत की, २० जुलै पर्यंत QR कोड असलेले कार्ड्स बनवण्याचं आमचं लक्ष्य आहे. त्यानंतर ते वितरित केले जातील. 

सध्या मुंबई महानगरपालिका तसेच मुंबई पोलिसांकडून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा, प्रवासाचा मार्ग याबाबतचा तपशील गोळा केला जातोय. QR कोड असलेले कार्ड्स वाटप केल्यानंतर सोशल डिस्टंसिंग राखून रेल्वेतून प्रवास करता येईल.

रेल्वे स्टेशनवर अशी होणार तपासणी :  

रेल्वे स्टेशनवर टीसी आणि उपस्थित अधिकाऱ्यांकडून  QR कोड असलेले कार्ड तपासण्यात येईल. उपस्थित कर्मचारी हा QR कोड त्यांच्या डिव्हाइसवरून स्कॅन करूनच तुम्हाला लोकल ट्रेनमध्ये बसण्याची आणि ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी मिळेल. 

local train travel special qr code cards will be distributed to all the emergency services workers

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Special Envoy Sergio Gor: ट्रम्प यांचे विशेष दूत सर्जियो गोर यांचं मोठं विधान म्हणाले, ''भारत आमचा धोरणात्मक भागीदार अन्... ''

IND vs WI Test Series: केएल राहुलकडे कसोटी संघाचे नेतृत्व, श्रेयस अय्यरचे पुनरागमन; वेस्ट इंडिजविरुद्ध अशी असेल टीम इंडिया

Modem Balakrishna : कोण होता मॉडेम बालकृष्ण? तब्बल एक कोटींचा होता इनाम, खात्मा झाल्याने नक्षलवाद्यांना मोठा झटका

Pune News : तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला मरेपर्यंत जन्मठेप

Nepal Protests : नेपाळमधील आंदोलनानंतर विमानसेवा सुरू, पर्यटकांचा मायदेशी परतीचा प्रवास

SCROLL FOR NEXT