मुंबई

वधू वर म्हणतात, आम्हाला 'तो' आनंदाचा क्षण 'असा' घालवायचा होता, पण...

शर्मिला वाळुंज

ठाणे - लग्न म्हणजे आयुष्यातील आनंदाचा आणि महत्त्वाचा क्षण. हा क्षण कायमचा स्मरणात रहावा यासाठी मोठ्या थाटामाटात लग्न करणे, प्री वेडींग शूट, रिसेप्शन, बॅचलर पार्टी यांसारख्या अनेक आनंदाच्या सोहळ्याचे आयोजन केले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न सोहळ्यांवर काही नियम लादण्यात आले आहेत. या नियमांमुळे अनेक वधू वरांना आपल्या सर्व स्वप्नांवर पाणी फेरावे लागल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे. लग्न असल्याने मनात आनंदाची भावना असली तरी मनाप्रमाणे तो क्षण साजरा होत नसल्याने काहीसे हिरमुसलेले ते बोहल्यावर चढणार आहेत.

लग्न कसे धूमधडाक्यातच झाले पाहीजे.. याची वरात फुल्ल गाजवायची... हळदीला धिंगाणाच करायचा नुसता... असे अनेक प्लॅन मित्रमैत्रिणींच्या गोतावळ्यात नेहमी रंगत असतात. त्यातच कोणाच्या घरी लग्नाची बोलणी सुरु असतील तर मग लग्नात काय काय करायचे याची मनात स्वप्नही रंगलेली असतात. मग ते खुद्द नवरा नवरीसह त्यांचे पालक, भावंड, नातेवाईक, मित्रमंडळी सारेच त्यांच्या या सोहळ्याच्या स्वप्नात सहभागी असतात.

कोरोनामुळे मात्र अनेकांना आपल्या या स्वप्नांवर पाणी फेरावे लागले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लग्न मुहूर्त आणखी पुढे ढकलू नये असा दबाव घरुन येत असल्याने वधूवरांना केवळ पंधरा वीस लोकांच्या उपस्थितीत आपला आनंदाचा क्षण साजरा करावा लागत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव किती दिवस राहील याचा अंदाज नाही, त्यातच पावसाळ्यास सुरुवात होण्याअगोदर लग्न सोहळे उरकून घेण्याचे प्लॅन विवाह घरात ठरले आहेत.

अमोल नलावडे म्हणाला, लॉकडाऊन काळातच माझे लग्न निश्चित झाले. दिवाळीनंतर लग्न करण्याचा विचार मी बोलून दाखविला परंतू लग्न जास्त काळ लांबवू नये असा दोन्ही घरातून विचार आल्याने जून महिन्यात आम्ही तारीख निश्चित केली. नातेवाईकांमध्येही मोजक्याच लोकांना आम्ही लग्नाला बोलाविले आहे. मित्रवर्ग मला मोठा असून ते सारे माझ्या लग्नाला येऊ शकत नसल्याने वाईट वाटत आहे. आम्ही खूप सारे प्लॅन केले होते, पण आता ते सगळे फेल झाले आहेत.

गार्गी भोईर म्हणाली मला लग्न मंडपात डोलीतून जायचे होते, तसेच प्री वेडींग मला महाबळेश्वरला करायची होती. पण सगळेच प्लॅन आम्ही रद्द झाले, केवळ काही लोकांच्या उपस्थितीत घरासमोरच माझे लग्न येत्या 11 जूनला होणार आहे.

तर किरण घाग म्हणाला, मे महिन्यात काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत माझे लग्न पार पडले आहे. लग्नात मनासारखी शॉपिंग करता आली नाही की काही नाही. माझी बायको लग्न पुढे ढकला म्हणून सांगत होती, परंतू घरच्यांनी ते मान्य न केल्याने आम्हाला साधे पणाने लग्न करावे लागले. सध्याची परिस्थिती पहाता हा निर्णय योग्य असला तरी आमच्याच लग्नाच्या वेळेस असे काही व्हायचे होते का असा विचार मनात येत असल्याचे तो सांगतो.

lockdown effect read what brides and grooms are saying about lockdown weddings

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT