मुंबई

लॉकडाऊनमध्ये पश्चिम रेल्वेला नफा तर झाला पण भरावा लागला 'इतक्या' कोटींचा भुर्दंड

विनोद राऊत

मुंबईः कोरोना व्हायरसचा सर्वत्र कहर पाहायला मिळतोय. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनानं लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे प्रशासनानं रेल्वे सुरु ठेवली. त्यामुळे लॉकडाऊन काळात कर्मचारी, कामगारांच्या कमतरेतवर मात करुन पश्चिम रेल्वेने दमदार कामगिरी बजावली आहे. या काळात देशाच्या कानाकोपऱ्यात अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी पश्चिम रेल्वेने नॉन स्टॉप सेवा दिली आहे. या दरम्यान मालवाहतूकीच्या माध्यमातून पश्चिम रेल्वेने 2 हजार 482 कोटींचा महसूल मिळवला. मात्र या लोकल सेवा आणि इतर पॅसेजर सेवा बंद असल्यामुळे पश्चिम रेल्वेला 1797 कोटींचं नुकसान झालंय. याबाबत स्वतः पश्चिम रेल्वेनं ही माहिती दिली आहे. 

  • 20 दशलक्ष टन मालवाहतूकअत्यावश्यक सेवेतही अग्रेसर

22 मार्च ते 19 जुलैपर्यंत  मालगाडीच्या 9624 रेक्स एवढी मालवाहतूक केली. यातून एकूण 19.51 दशलक्ष टन  मालवाहतूक या काळात झाली. यामध्ये खते, मिठ, अन्नधान्य, सिमेंट, कोळसा आणि इतर साहित्यांचा समावेश आहे. अत्यावश्यक वस्तु औषधे, दूध, दूधाची भूकटी आणि इतर वस्तुंची वाहतूक पश्चिम रेल्वेने केली आहे. बहुतांश अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा दुर्गम ईशान्य भारतातील राज्यात करण्यात आला.

  • लॉकडाऊनमुळे 1700 कोटींचा फटका

लॉकडाऊनमुळे पश्चिम रेल्वेचे 1797 कोटी रुपयाचं नुकसान झालं आहे. यामध्ये लोकल सेवा 265 कोटी तर लोकल वगळता इतर सेवा ठप्प असल्यामुळे रेल्वेचे 1532 कोटींचं नुकसान झालंय. 1 मार्च ते 13 जुलैपर्यंत रद्द तिकीटाच्या परताव्यापोटी पश्चिम रेल्वेनं 398.79 कोटी रुपये प्रवाशांना परत केलेत .यामध्ये मुंबई विभागातून 190.64 कोटी रुपयाचा परतावा प्रवाशांना दिला आहे. या काळात 61.27 लाख प्रवाशांनी त्यांचे तिकीट रद्द केले होते.

  • अत्यावश्यक सेवा, पार्सल ट्रेन

23 मार्च ते 19 जुलैपर्यंत 80 हजार टन औषध,मासे, दूधाची वाहतूक केली. यामधून 25.26 कोटीचा महसूल मिळवला. या काळात 60 दूधाच्या विशेष रेल्वेगाड्या चालवल्या. 337 विशेष पार्सल ट्रेन चालवण्यात आल्यात.

संपादनः पूजा विचारे

In lockdown Western Railway earned Rs 2,482 crore

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

Pune Crime : तळलेल्‍या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर; ‘एफडीए’ ची ५ ठिकाणी धाड, १९ लाखाहून अधिक रकमेचा साठा जप्त

Jalana Viral Video: दागिन्यावर डोळा, गावकऱ्यांनी भोंदूबाबाला दिला चांगलाच चोप, काय घडलं?

समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजच्या परिसरात छोट्या विमानाच्या गिरट्या; नेमकं काय घडलं? चर्चांना उधाण...

Satana Suspicious Case : मध्यरात्रीच्या संशयास्पद विधीने खळबळ; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल, तपास वेगात

SCROLL FOR NEXT